
Gadchiroli News : महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुती सरकारन पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. ऐतिहासिक बहुमतासह सत्तेत परतलेल्या महायुती सरकारची कमान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या फडणवीसांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.त्यांनी नुकताच अधिकाऱ्यांकडून शंभर दिवसांचा 'रोडमॅप' मागवला आहे. अशातच आता त्यांनी माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धमाका केला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची (Gadchiroli) ओळख होती,पण यापुढे गडचिरोली शेवटचा नाहीतर राज्याचा पहिला जिल्हा असेल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपदही स्वत:कडेच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यांनी बुधवारी (ता.1 जानेवारी) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे उलटले आहेत.पण या साडेसात दशकांनंतरही महाराष्ट्रातील अशी अनेक गावं आहेत,जिथं अद्यापही लाईट,एसटी बसची सेवा पोहचलेली नाही. गडचिरोली जिल्ह्यात जिथं माओवाद्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे, अशा भागात हेच चित्र पाहायला मिळतं. पण आता गडचिरोली जिल्ह्यात सरकारनं माओवाद्यांचा बंदोबस्त करत वेगवेगळे मोठे मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही असाच नववर्षांची सुरुवातच मोठा धडाकेबाज निर्णय घेतला माओवाद्यांना दणका दिला आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात पक्का रस्ता बांधत थेट बससेवाही सुरु केली आहे. गर्देवाडा ते वांगेतुरी या रस्त्यावरील जवळपास 15 गावांना आता पहिल्यांदाच बससेवेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.आश्चर्याची बाब म्हणजे उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लालपरी या एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जिद्द आणि हिंमतीनं गट्टा ते वांगेतुरी या मार्गावरचा 32 किलोमीटरचा रस्ता बांधला आहे. याच यशामुळे आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 76 वर्षानंतर इथं लालपरी धावली आहे.
पहिल्यांदाच बुधवारी गर्देवाडा येथून पुढे म्हणजेच महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या वांगेतुरीपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास 76 वर्षे एसटी बसची प्रतीक्षा पाहिलेल्या ग्रामस्थांच्या चेहर्यावरचा आनंद लपून राहिला नाही.ग्रामस्थांनी सरकारचं या आभार व्यक्त केलं.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख बदलण्याचा इरादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला होता.माओवाद्यांचं वर्चस्व राहिलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहिल असंही त्यांनी म्हटलं होतं.या पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही इच्छा व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.
एकेकाळी गडचिरोलीचं पालकमंत्री पद घ्यायला कोणी धजावत नव्हतं.पण माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटलांनी ही प्रथा मोडीत काढली. गडचिरोलीच्या विकासासाठी पूर्ण झोकून देत काम केलं. यानंतर मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय काम करुन दाखवलं. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनीही गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून मेहनत घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.