Common Man Angry On Government : 'बूढे भी अब जवानी की दुवा मांगेंगे'; टीकेची गाडी सुसाट, 'कार्यकर्ता' सरकारवर भडकला !

Yavatmal : सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत एका कार्यकर्त्याने अफलातून शक्कल लढविली.
Yavatmal Common Man
Yavatmal Common ManSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Political News : ‘जरी मी वृद्ध आहे, तरी निवृत्त न झालो फारसा, मी सोडल्या आहेत फक्त दोन गोष्टी, कंगवा आणि आरसा" या ओळी तंतोतंत सार्थ ठराव्या. नव्हे तर शासनाच्या काही निर्णयांनी राज्यात वृद्धांना चांगले दिवस आले आहेत. ‘बूढे भी अब जवानी की दुवा मांगेगे...! अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (An activist protested against the wrong policies of the government)

सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत एका कार्यकर्त्याने अफलातून शक्कल लढविली. त्याच्या टीकेची गाडी सोशल मीडियात तुफान ‘स्पीड’ने निघाली आहे. भडकलेल्या त्या कार्यकर्त्याच्या गाडीवरून शासन प्रचंड ट्रोल होत आहे.

शासनाने खासगी कंपन्यांना प्रशासन चालविण्यासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट दिले. एवढेच नव्हे तर भरीस भर प्रशासनाने नुकतीच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

शासनाच्या या निर्णयाने आणि प्रशासनाच्या त्या जाहिरातीने यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगार दुखावला गेला आहे. शिवाय जागरूक नागरिकही संतप्त झाले आहे. त्यातूनच संपूर्ण राज्यात बेरोजगार आंदोलन करीत सुटले आहेत. अशाच एका संतप्त कार्यकर्त्याने शासनाच्या भूमिकेवर बोट ठेवत जनजागृती चालविली आहे.

त्याने त्याच्या ओमिनी कारच्या मागील काचेवर ‘तरुण पोर शिकवून घरी बसवा आणि बापाला आराम करायच्या वयात कंत्राटी कामाला पाठवा, संदर्भ कंत्राटी भरती’, असे लिहून टीकात्मक जनजागृती चालविली आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही. 'निर्णय वेगवान, शासन गतिमान' हे शासनाचे ब्रीद वाक्य त्याच काचेवर लिहून चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

शिवाय नंबर प्लेटवर 'कार्यकर्ता' असे अधोरेखित केले आहे. याच कारचे छायाचित्र आता सोशल मीडियातून चांगलेच व्हायरल होत आहे. नव्हे तर नेटकरी त्याच्या अफलातून शक्कलीला पसंती देत आहेत. याउलट मात्र शासनाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात नेटकरी आसूड ओढताना दिसून येत आहेत.

'गाव जगाओ, चोर भगाओ'चा संदेश...

सोशल मीडियात कार्यकर्त्याच्या टीकेची गाडी जनजागृती करीत सुसाट वेगाने सुटली आहे. याच कारच्या मागील बाजूला त्याने 'गाव जगाओ, चोर भगाओ'चा संदेश दिला आहे. हा संदेशही नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या या टीकेवरून शासन आतातरी काही बोध घेईल का, असे प्रश्‍न नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.

Edited By : Atul Mehere

Yavatmal Common Man
Yavatmal News : कंत्राटी भरतीवरून तरुणांच्या संतापाचा भडका; भीक मागून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले पैसे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com