Congress News : काँग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका, डॉ. अभय पाटील यांनी साथ सोडली

Vidarbha Politics : स्पष्टवक्ता, अभ्यासू आणि जनसामान्यात लोकप्रिय असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील यांनी ३१ जुलै रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सोशल मिडियावरून जाहीर केला.
Dr. Abhay Patil
Dr. Abhay Patil Sarkarnama
Published on
Updated on

Akola News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करताच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अकोला जिल्ह्यात मोठा धक्का बसला. अकोला लोकसभेची निवडणूक लढलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांनी आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे फोसबुकवर पोस्ट टाकून जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत अस्वस्थता उफाळून आली असल्याचे दिसून येते.

स्पष्टवक्ता, अभ्यासू आणि जनसामान्यात लोकप्रिय असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील यांनी ३१ जुलै रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सोशल मिडियावरून जाहीर केला. गेल्या दशकभरात अकोल्यात काँग्रेसचे पुनरुज्जीवन करणाऱ्या नेतृत्वापैकी एक असलेल्या डॉ. पाटील यांचा हा निर्णय जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. हा राजीनामा नसून नाराजीनामा असल्याचे सांगण्यात येते.

माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉय पाटील यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. काँग्रेसच्या हमखास निवडून येण्याऱ्यांच्या यादीत पाटील यांच्या नावाचा समावेश होता.

मात्र, प्रकाश आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढल्याने त्यांचे सर्व समीकरण विस्कळीत झाले. पाटील अवघ्या २७ हजार मतांनी पराभूत झाले. प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीत तब्बल अडीच लाख मते घेतल्याने भाजपचे उमेदवार अनुप धोतरे नशिबावन ठरले.

Dr. Abhay Patil
Rohit Pawar News: खळबळजनक! शरद पवारांच्या नेत्याची गाडी पेटवली...; रोहित पवारांचे गंभीर आरोप,फडणवीसांकडे मोठी मागणी

पाटील यांनी राजीनाम्याचे कारण कौटुंबिक, सामाजिक आणि वैद्यकीय जबाबदाऱ्या असे दिले आहे. सोबतच त्यांनी "पक्ष सोडला, विचारधारा नाही," असे सांगून त्यांनी परतीचे दोर कापले नसल्याचे दिसून येते. त्यांच्या राजीनाम्याने अंतर्गत नाराजी, दुय्यम वागणूक आणि पक्षीय अनास्था लपली आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. पाटील यांनी 2014 साली काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि अल्पावधीतच पक्षात आपली छाप पाडली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अकोला मतदारसंघातून उमेदवारी मिळवून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला जबरदस्त लढत दिली.

Dr. Abhay Patil
Shivaji Sawant : तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांनी शिवसेनेतील पदाचा तडकाफडकी राजीनामा का दिला? ही असू शकतात प्रमुख कारणे....

त्यांच्या सभांमधील मुद्देसूद भाषणं आणि कार्यकर्त्यांशी थेट संवादामुळे काँग्रेसचा निष्क्रिय सामान्य मतदार पुन्हा सक्रिय होऊ लागला होता. आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक आंदोलन सुरू असताना अकोला जिल्ह्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com