Congress News: राहुल गांधींचा फोन अन् काँग्रेसचा नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन परत फिरला, फडणवीसांच्या खासगी सचिवांनी आमदार पत्नीसाठी टाकलेला डाव फसला?

Rahul Bondre BJP entry : बुलढाण्याच्या राजकारणातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि माजी आमदार राहुल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याचदरम्यान,बोंद्रे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तबही केलं होतं. बोंद्रे यांचा भाजपप्रवेश हा काँग्रेस पक्षासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसाठीही मोठा धक्का मानला जात होता.
Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
Rahul Gandhi call Rahul Bondre .jpgSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: बुलढाण्याच्या राजकारणातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि माजी आमदार राहुल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याचदरम्यान,बोंद्रे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तबही केलं होतं. बोंद्रे यांचा भाजपप्रवेश हा काँग्रेस पक्षासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसाठीही मोठा धक्का मानला जात होता. त्यामुळे बोंद्रेचा भाजपप्रवेश रोखण्यासाठी दिल्लीतून सूत्रे फिरली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनीच भाजपच्या वाटेवर असलेल्या बोंद्रेंना फोन केला. यानंतर अगदी भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले बोंद्रें परत फिरले.

बुलढाणा येथील चिखली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय फायनल केला होता.2024 च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू असलेल्या बोंद्रेंसाठी यावेळी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खासगी सचिव पती विद्याधर महाले यांनीच मध्यस्थी केल्याचीही चर्चा होती.यासाठी मोठी राजकीय तडजोडही बोंद्रे यांनी केल्याचंही बोललं जात होतं. पण अखेर बोंद्रेंचं बंड सध्यातरी थोपवण्यात काँग्रेसला यश आल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी माजी आमदार राहिलेल्या राहुल बोंद्रेंना फोन करुन त्यांना काँग्रेसमध्ये थांबण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनी यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रेंना फोन करत दबावाखाली येऊन तुम्ही कोणताही निर्णय घेऊन नका, कुठेही जाऊ नका, ही तुमची चूक ठरेल,असं सांगितलं. तसंच तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हांला माहिती आहे. आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही राहुल गांधी यांनी त्यांना फोनवरुन यावेळी दिला.

तसेच तुम्ही काँग्रेसचे लॉयल आहात, पक्षाला तुमची गरज असल्याचं म्हटलं.तसेच तुम्ही पक्षासाठी चांगलं कार्य केलं आहे, तुम्ही तुमच्या भाजपप्रवेशाच्या निर्णयाचा फेरविचार करा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी बोंद्रे यांची मनधरणी केली. खुद्द राहुल गांधींनीच फोन करत बोंद्रेंच्या बंडाची दखल घेतली.

Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
Devendra Fadnavis News: ...म्हणून भाजपमध्ये अस्वस्थता..! मुख्यमंत्री फडणवीस घेणार पुणे अन् पिंपरीतील नगरसेवकांची ‘शाळा’

यानंतर त्यांनी आपला भाजपप्रवेशाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याचं ठरवलं.ते राहुल गांधींना म्हणाले, तुम्ही मला फोन केलात, माझी दखल घेतली. यावेळी राहुल गांधींना आता माझे सर्वकाही गमावले तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासोबत लढ्यात कायम काम करत राहणार असल्याचा शब्दही माजी आमदार राहुल बोंद्रेंनी यावेळी दिला.

राहुल बोंद्रे यांच्या या निर्णयाने काँग्रेसचा मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले जात होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानं जिल्ह्यात मोठा हादरा बसणार होता. आता मात्र, राहुल गांधींनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. पण भाजप आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती विद्याधर महाले यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धीच संपवण्याचा डाव फसल्यातच जमा झाला आहे.

Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
High Court DJ: विद्यानंद बापटांचा मोठा विजय? सण-उत्सवातील ध्वनी प्रदुषणाची मुंबई हायकोर्टानं स्वत:हून घेतली दखल, उद्या महत्त्वाचा निर्णय ?

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच चर्चा सुरु होती. यापूर्वी भाजपच्याच काही नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. मात्र, या चर्चेला प्रत्यक्ष प्रवेशाचे स्वरूप आले नव्हते. बोंद्रे आणि आमदार श्वेता महाले हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत बोंद्रेंना दोनवेळा पराभूत करत श्वेता महाले यांनी चिखलीच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केले आहे.

राहुल बोंद्रे यांनी भाजप हा राजकीय पुनर्वसनाचा पर्याय ठरवण्याच्या तयारीत होते. त्यांच्या शैक्षणिक, सहकारी संस्थांना राजकीय वरदहस्त आणि अभय मिळवण्याचा बोंद्रे यांचा प्रयत्न होता. त्यांच्या संस्थात्मक आणि सामाजिक प्रभावाला राजकीय व्यासपीठ मिळवून पुन्हा विधानसभेच्या राजकारणात परतण्याचा डाव बोंद्रे यांनी आखल्याचंही बोललं जात होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com