Congress Protest News: ...अन् आंदोलनापूर्वीच दोन महिला काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली!

Vidarbha Congress Politics : विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी संविधान चौकात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा महिला काँग्रेसच्यावतीने नियोजित करण्यात आले होते. या आंदोलनात राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यासुद्धा सहभागी होणार आहे.
Congress News.jpg
Congress News.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासोबतच विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी( ता.29) आयोजित केलेल्या आंदोलनापूर्वीच महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आणि शहर अध्यक्ष नंदा पराते यांच्यात जुंपली.

आंदोलनाची माहिती देताना संध्या सव्वालाखे यांनी महिला काँग्रेसमध्ये कुठलेचे मतभेद नाहीत, वाद नाहीत असा दावा पत्रकारपरिषदेत केला. त्यानंतर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नंदा पराते उपस्थित झाल्या. आपल्या शहरात काँग्रेसचे (Congress) एवढे मोठे आंदोलन असताना माहिती देण्यात आली नाही, कळवण्यात आले नाही असा आक्षेप त्यांनी माध्यमांसमोरच नोंदवला.

विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी संविधान चौकात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा महिला काँग्रेसच्यावतीने नियोजित करण्यात आले होते. या आंदोलनात राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यासुद्धा सहभागी होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात बदलापूर (Badlapur) येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराही या आंदोलना दरम्यान निषेध नोंदवण्याचा निर्णय महिला काँग्रेसच्यावतीने घेण्यात आला आहे.

Congress News.jpg
Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला..' ; देवेंद्र फडणवीसांकडूनही पलटवार!

संध्या सव्वालाखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. मात्र शहर महिला काँग्रेसच्या आजी-माजी अध्यक्ष नंदा पराते आणि नॅश अली पत्रकार परिषदेला उपस्थित का नाही असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर सव्वालाखे यांनी सर्व पदाधिकारी आंदोलनाची तयारी करीत आहेत, निरोप देत आहे असे सांगितले. आमच्यात कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत असाही दावा त्यांनी यावेळी केला.

Congress News.jpg
Manoj Jarange Patil: बीडमध्ये जरांगे पाटलांची भलतीच 'डेअरिंग'; समर्थकांना घामच फुटला; 'वाहत्या नदीत...'

पत्रकार परिषद आटोपताच शहराध्यक्ष नंदा पराते दाखल झाल्या. त्यांना आंदोलनाच्या तयारीबाबत विचारणा केली असता आपणास आंदोलनाची माहितीच नसल्याचे सांगून त्यांनी प्रदेशाध्यक्षांनाच तोंडघशी पाडले. प्रदेशाध्यक्ष पत्रकार परिषद घेणार आहेत याची माहितीसुद्धा आपणास देण्यात आली नाही असेही नंदा पराते यांनी सांगितले. आपल्याला डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी जाहीरपणे केला.

Congress News.jpg
Droupadi Murmu : 'आता बास झालं! मी खूप निराश आणि भयभीत झाले!' राष्ट्रपती का झाल्या एवढ्या भावनिक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com