Eknath Shinde : 'फडणवीस सावजीसारखे तिखट अन् नागपुरी संत्र्यासारखे गोड...', एकनाथ शिंदेंकडून स्तुतिसुमनांची उधळण

Eknath Shinde on Devendra Fadnavis: 'अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील बिग बी असतील तर देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी आहेत. 2022 साली मी जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातील सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 10 Dec : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे कार्यकर्ते फोडल्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद उफाळून आला होता.

मात्र, काल नागपूरमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याचं पाहायला मिळालं. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत.

ते चिडचिड न करता अंगावर येणाऱ्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही वाद नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Vande Mataram Debate : 'वंदे मातरम्'चा 'इव्हेंट' भाजपच्या अंगलट, पैशाच्या जोरावर घोटाळे करून निवडून येणाऱ्या सरकारचे पंतप्रधान हीच मोदींची जागतिक ओळख...'

तर देवेंद्र फडणवीसांकडे हसतखेळत विरोधकांना चीतपट करण्याची क्षमता आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. त्यांनी कधीही या टीकेला उत्तर दिले नाही. पण ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात.

अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील बिग बी असतील तर देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी आहेत. हा डी म्हणजे डिव्होशन, डेडिकेशन, डेरिंग, डिसिप्लिनचा आणि डिटरमेशनचा आहे. 2022 साली मी जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातील सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे, अशी स्तुतीसुमनं शिंदेंनी फडणवीसांवर उधळली.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
BJP Politics: वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी; आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांच्या भावना

यावेळी त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करताना फडणवीस मला हुडी घालून भेटायला यायचे या घटनेचा उल्लेख करत, त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती, असा टोला लगावला. तर 'मी यारो का यार, दुश्मनो का दुश्मन आहे', हे त्यांनी अनेकदा दाखवलंय, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

शिंदेंच्या या वक्तव्यामुळे आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित मैदानात उतरणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय स्थानिकच्या निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही अलबेल नाही आणि युती तुटण्याची शक्यता आहे, अशा सर्व चर्चांना शिदेंच्या या भाषणामुळे पुर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com