Modi On Praniti Shinde : प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर नरेंद्र मोदी प्रचंड संतापले, म्हणाले, ‘तमाशा कहते हो...’

Operation Sindoor : ‘पहलगाम हल्ला आणि ऑपेरशन सिंदूर’वरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. लोकसभेत बोलताना त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या त्या विधानावरून काँग्रेसच्या हायकमांडवर हल्लाबोल केला.
Praniti shinde-Narendra Modi
Praniti shinde-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 29 July : काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सरकारने माध्यमांमध्ये केलेला तमाशा होता,’ असे विधान सोमवारी (ता. 28 जुलै) लोकसभेत बोलताना केला होता. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 29 जुलै) काँग्रेस पक्षाला सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये हिम्मत नसल्यामुळे ते अशी विधाने नवख्या सदस्यांकडून वदवून घेतात, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे.

संसदेत सोमवारपासून (ता. 28 जुलै) पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते. पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असे विधान केले होते. त्याला आज मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, काँग्रेसच्या एक नवख्या खासदार....त्यांना आपण माफ केलं पाहिजे; कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे? पण काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, त्यांच्याकडून वदवून घेतात. कारण, काँग्रेसच्या आकामध्ये हिम्मत नाही.

नवख्या सदस्यांकडून काँग्रेसचे आका वदवून घेतात की, ऑपेरशन सिंदूर हा तर तमाशा होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या २६ लोकांना मारलं, त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे. तमाशा म्हणता. तुमची असहमती असू शकते. पण, काँग्रेस पक्षाचे लोक असं वदवून घेतात, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला.

Praniti shinde-Narendra Modi
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचे लोकसभेत वादग्रस्त विधान; ‘ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारने केलेला एक तमाशा होता...’ (Video)

‘डोनाल्ड ट्रम्प’बाबत काय म्हणाले?

भारत-पाकिस्तान युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर थांबविण्यात आले, असा आरोप होत आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना भाष्य केले आहे. ते म्हणाले, जगातील कोणत्याही नेत्यानं आमच्यावर ऑपरेशन सिंदूर थांबवविण्यासाठी दबाव टाकलेला नाही.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत काय बोलणं झालं होतं?

मोदी म्हणाले, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला 09 मे रोजीच्या रात्री फोन करायचा प्रयत्न करत होते. ते सुमारे तासभर प्रयत्न करत होते. पण, लष्करासोबतच्या बैठकीत व्यस्त होतो, त्यामुळे मी त्यांचा फोन घेऊ शकलो नाही. बैठक संपल्यानंतर त्यांना फोन केला असता, त्यांनी ‘पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे,’ असे मला सांगितले.

Praniti shinde-Narendra Modi
Praniti Shinde's controversial statement : ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला भाजपने जोडे मारले; ‘आमच्या खासदार असल्याची खंत वाटते’

पाकिस्तान जर हल्ला करण्याच्या विचारात असेल तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जर पाकिस्ताननं आमच्यावर हल्ला केला तर आम्हीही त्यांना जशास तसा उत्तर देऊ, असे मी त्यांना सांगितले होते, असे मोदी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com