Radhakrishna Vikhe Patil News : विखे पाटलांचे पोस्टर जाळले : धनगर समाज आक्रमक; सात दिवसांत राजीनामा द्या!

Dhangar reservation : मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
Radhakrishna Vikhe Patil News
Radhakrishna Vikhe Patil NewsSarkarnama

Amravati : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर काल (शुक्रवारी) भंडारा उधळण्यात आला. भंडारा उधळणाऱ्या शंकर बंगाळे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीवरून अमरावतीमध्ये धनगर समाज संतप्त झाला आहे.

आज (शनिवारी) राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी या वेळी विखे पाटलांचे पोस्टर जाळले. विखे पाटलांच्या विरोधात आंदोलकांनी भंडारा लावून जोरदार घोषणाबाजी केली. विखे पाटलांनी सात दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil News
G20 Summit News : जगभराच्या प्रमुखांसमोर मोदींनी देशाची करून दिली नवी ओळख; 'इंडिया' नव्हे 'भारत'...

राधाकृष्ण विखे पाटील काल सोलापूर दौऱ्यावर होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते शासकीय विश्रामगृहात थांबलेले असताना आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे काही सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. शंकर बंगाळे यांनी अचानक विखेंच्या डोक्यावर भंडारा उधळला. त्यांनी विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून राग व्यक्त केला. विखेंच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना चोप दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला आहे.

Radhakrishna Vikhe Patil News
Chandrababu Naidu News : चंद्राबाबूंच्या अटकेमागील नेमके कारण काय?

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी विखे पाटलांना खंडोबाच्या भंडाऱ्यांची महती सांगत " आशीर्वाद समजून कपाळाला लावा,"असे सुचवले आहे. "खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नका. जर काहींनी तो विखे पाटलांवर उधळला असेल, तर त्याला त्यांनी आशीर्वाद समजावा," असे पडळकर म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com