Nagpur, 20 June : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रम हे गोंदियाचे पालकमंत्री सोडणार आल्याची माहिती आहे. प्रकृतीच्या कारणास्तव तसेच विधानसभा निवडणुकीत गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात विशेष लक्ष देण्यासाठी धर्मरावबाबा आत्रम यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर धर्मरावबाबा आत्रम (Dharamraobaba Atram ) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ दिली. त्यामुळे आत्रम यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली हेाती. त्यांच्याकडे अन्न व प्रशासन विभागाचे मंत्रिपद देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे होम ग्राउंड असलेल्या गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धर्मरामबाबा आत्रम यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
धर्मरावबाबा आत्रम यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे गडचिरोलीपासून गोंदियापर्यंत आत्रम यांना धावपळ करावी लागत होती. शस्त्रक्रियेमुळे ही धावपळ होणार नसल्याचे सांगून आपण गोंदियाचे पालकमंत्री सोडणार असल्याचे मंत्री आत्रम यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाच्या जास्तीत जास्त जागा निवडणून आणण्याचा धर्मरावबाबा आत्रम यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी आत्रम यांनी स्वतःचा जिल्हा असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या दोन जिल्ह्यातून अजित पवार यांच्या पाठीशी जास्तीत जास्त आमदार उभे करण्याचा प्रयत्न आत्रम यांचा आहे.
विधानसभा निवडणूक आणि प्रकृतीचे कारण गोंदियाचे पालकमंत्रिपद सोडताना धर्मरावबाबा आत्रम यांनी दिले असले तरी त्यामागे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचा पराभव तर कारणीभूत नाही ना, अशी चर्चा आत रंगली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंढे हे निवडणुकीत उभे होते.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे विजयी झाले आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकरी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनील मेंढे हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे गोंदियाचे पालकमंत्रिपद सोडण्यामागे लोकसभेतील पराभव हे तर कारण नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.