Harshvardhan Sapkal : देशात मुदतपूर्व निवडणूक, तयारीला लागा; हर्षवर्धन सपकाळांचे कार्याकर्त्यांना आवाहन

Harshvardhan Sapkal appeal News : राहूल गांधी यांनी व्होटचोरीचा मोठा धमाका केला आहे. यामुळे मोदी सरकार घाबरले आहे. राहूल गांधी यांच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले, या भीतीने संसदेचे अधिवेशन चालू दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Harshawardhan Sapkal
Harshawardhan Sapkal sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपने केलेली मतचोरी उघड झाली आहे. याचे सरकाराला याचे उत्तर द्यावेच आणि मोदी सरकारला पायउतार व्हावेच लागणार असल्याचा दावा करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देशात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याचे सांगून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

काँग्रेसने ‘व्होट चोर गद्दी छोड' आंदोलनाची सुरुवात बुधवारपासून केली. कामठी विधानसभा मतदारसंघातील मतजोरी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सर्व प्रथम उघडकीस आणली. त्याकरिता कामठी येथून राज्यव्यापी आंदोलनाला काँग्रेसने सुरुवात केली आहे.

Harshawardhan Sapkal
Manoj Jarange Patil Agitation: मराठा आरक्षण आंदोलन; डॉ राधाकृष्ण विखे पाटील ठरले मुख्यमंत्र्यांचे नवे संकट मोचक!

या आंदोलनासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देशात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सरकार येणार असल्याचा दावाही केला. मत चोरांच्या गळ्यात घंटा बांधायला आमचा ढाण्यावाघ राहूल गांधी लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Harshawardhan Sapkal
Manoj Jarange Patil News : गैरसमज करून घेऊ नका, सगळे मराठे ओबीसीत जाणारच! माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका..

भाजपला मतचोरी वाट कामठीच्या आमदाराने दाखवली. एका एका मोबाईलवरून ५०० मतदारांची नोंदणी केली. एका झोपडीत २०० मतदार मतदारांनी नावे घुसाडली. त्यामुळे पहिला बंदोबस्त कामठीच्या आमदाराचा करायचा आहे. आता हातावर हात ठेवून बसलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. राहूल गांधी यांनी व्होटचोरीचा मोठा धमाका केला आहे. यामुळे मोदी सरकार घाबरले आहे. राहूल गांधी यांच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले, या भीतीने संसदेचे अधिवेशन चालू दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Harshawardhan Sapkal
Manoj Jarange Patil update : जरांगेंनी उपोषण सोडताच फडणवीस सरकारने काही तासांत दुसरा ‘जीआर’ही काढला, 5 महत्वाचे निर्णय

‘व्होट चोर गद्दी छोड' हा नारा आता देशभरात घुमू लागला आहे. तसेही नागपूरच्या रेशीमबागेतील बागेतील बाबाने वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्याने दिल्लीच्या बाबाला खुर्ची रिकामी करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणूक अटळ आहे. आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आता मतचोरी चालणार नाही. जनता तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस हे तुफान आहे, देशाचा स्वाभिमान आणि अभिमान असल्याचेही यावेळी सांगून हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे.

Harshawardhan Sapkal
Manoj Jarange Patil update : जरांगेंनी उपोषण सोडताच फडणवीस सरकारने काही तासांत दुसरा ‘जीआर’ही काढला, 5 महत्वाचे निर्णय

या सभेला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष आश्विन बैस, सुरेश भोयर यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे खासदार आणि आमदार उपस्थित होते.

Harshawardhan Sapkal
Manoj Jarange Patil Agitation: सकल मराठा समाजाचे थेट राज्यपालांना साकडे; मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या कारस्थानाची चौकशी करा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com