Vidharbha Politic's : एकनाथ शिंदेंचा मोर्चा आता विदर्भाकडे; माजी आमदारासह ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदेसेनेच्या वाटेवर!

Eknath Shinde Nagpur Tour : रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे त्यांची आभार सभा होणार असून या सभेत ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. यात एका माजी आमदाराचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 17 February : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वत्र गळती लागली आहे. अनेक जण शिंदे सेनेत सहभागी होऊ लागले आहे. कोकणानंतर आता शिंदे सेना विदर्भातही खिंडार पाडणार असल्याचे दिसून येते. त्याकरिता २० फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात येत आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे त्यांची आभार सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. यात एका माजी आमदाराचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

अर्थ व पर्यटन राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले, आम्ही सत्तेत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) आता कोणालाही भवितव्य दिसत नाही, त्यामुळे आमच्याकडे येणासाठी रांगा लागल्या आहेत. मात्र, कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याचे स्क्रिनिंग स्वतः एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यामुळे आत्ताच कोण येणार, याचा पेपर फोडता येणार नाही, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. कॉमन मॅन म्हणून त्यांनी आपला चाहता वर्ग तयार केला आहे. त्यांनी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. महायुतीला सत्तेत आणण्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरली आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Madha Politic's : अकलूजचे धैर्यशील अन्‌ फलटणचे रणजितसिंह यांना एकमेकांशेजारी बसविण्यासाठी शहाजीबापूंची धडपड!

शिंदे यांच्या नेतृत्वात लढलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल ५८ आमदार निवडून आले आहेत. विदर्भातील दोन नेत्यांना तब्बल २८ वर्षानंतर त्यांनी विधान परिषद पाठवले आहे. विदर्भाला मंत्रीपदसुद्धा त्यांनीच दिले. विदर्भाला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यामुळे विदर्भातील अनेकजण आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत.

शिवसेनेच्या वतीने शिवकार्य सदस्य नोंदणीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. शिंदे यांनी ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे, त्या सर्व मतदारसंघात आभार सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून पक्षाचा प्रचार आणि प्रसारसुद्धा केला जाणार आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Dhananjay Deshmukh : धस-मुंडे ‘पॅचअप’साठी प्रयत्न करणाऱ्या बावनकुळेंचा खेद वाटतो, त्यांना दुसऱ्याच भेटीत जादा इंटरेस्ट : धनंजय देशमुखांनी बोलून दाखवली सल

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितच लढणार आहे. काही जागांवर याचा अपवाद होऊ शकतो. मात्र, वरिष्ठ पातळीवर याबाबत कुठलेही मतभेद नाहीत. शिंदेसुद्धा नाराज नाहीत, असेही यावेळी आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com