Mahayuti Dispute News : ‘मला हलक्यात घेऊ नका,’ असं एकनाथ शिंदे कोणाला म्हणाले?; शिवसेनेच्या मंत्र्याने थेट नावच सांगितले

Eknath Shinde Statement : महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आम्ही कुठलीही चाचपणी केली नाही. तशी आमची भूमिकासुद्धा नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मिळून करतील.
Ashish Jaiswal-Eknath Shinde
Ashish Jaiswal-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 15 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते महायुतीतून बाहेर पडणार. उद्योग मंत्री उदय सामंत २० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्री होणार, शिवसेना महापालिकेच्या निवडणूक स्वबळावर लढणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्या ‘आम्हाला हलक्यात घेऊ नका’ या वक्तव्याने भर घातली आहे. आता त्यांचा रोख आणि इशारा कोणाला, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून या चर्चांना काही अर्थ नसल्याचे असे स्पष्ट केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना हलक्यात घेतले होते. त्यामुळे ठाकरे गटाची काय गत झाली, हे सर्वांनीच बघितलेच आहे. त्यांनी आता भारतीय जनता पक्षाला नव्हे; तर विरोधकांना इशारा दिला असावा, असे सांगून राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एकप्रकारे भक्कम बचाव केला आहे.

आम्ही महायुती म्हणून विधानसभेची निवडणूक एकत्रित लढलो. एकत्रित सरकार स्थापन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा एकत्रित लढण्याचा आमचा मानस आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath shinde) जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असतील. ‘मातोश्री’ने त्यांना आजवर हलक्यात घेतले होते. अजूनही हलक्यातच घेत आहे. त्यामुळे ‘मातोश्री’लाच त्यांनी पुन्हा इशारा दिला असले असे त्यांनी स्पष्ट केले.

Ashish Jaiswal-Eknath Shinde
Maharashtra Politic's : येत्या चार दिवसांत दोन बडे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार; शिंदेंच्या मंत्र्याने लावली फिल्डिंग

महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आम्ही कुठलीही चाचपणी केली नाही. तशी आमची भूमिकासुद्धा नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मिळून करतील. आम्ही या निवडणुकीलासुद्धा एकत्रितच सामोरे जाऊ, असे सध्याचे चित्र आहे.

आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांचा पराभव केला. चार वेळा निवडून येणाऱ्या जयस्वाल यांची प्रथमच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे ते अर्थखात्याचेही राज्यमंत्री आहेत.

Ashish Jaiswal-Eknath Shinde
Vanraj Andekar Murder Case : बोपदेव घाटात प्लॅनिंग..तीनदा ट्रॅप फसला, पण चौथ्यावेळी आंदेकरांचा गेम झाला; 1700 पानांचे दोषारोपपत्र दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्रीही केले आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच लागली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वतःहून स्वीकारले आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नाईलाज झाला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com