Eknath Shinde News : लोकसभेला विदर्भात 'बॅकफूट'वर, विधान परिषदेला जोरदार 'कमबॅक', शिंदेंच्या गवळी, तुमानेंनी विजयाचा गुलाल उधळला

Vidhan Parishad Election 2024 Results : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार रिंगणात उतरले होते.
Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane
Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal TumaneSarkaRNAMA
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक शुक्रवारी पार पडली.ही निवडणूक 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत कोणाची विकेट पडणार याविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अखेर या निवडणुकीत महायुतीचे नऊही उमेदवार उमेदवारही विजयी झाले आहेत.

त्यात लोकसभेला विदर्भात बॅकफूटला गेलेल्या शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेत जोरदार कमबॅक केले आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने असे दोन्हीही उमेदवार विदर्भातले दिले होते. आता गवळी आणि तुमाने यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

विधान परिषदेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.आगामी विधानसभा निवडणुकीआधीची ही निवडणूक असल्याने या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत विजयाचा दावा ठोकला होता.

आता यात महायुतीचे नऊपैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत.तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे.

Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane
Pankaja Munde Win : पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला; विधान परिषदेतून नवी इनिंग

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार रिंगणात उतरले होते. या सर्व उमेदवारांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कंबर कसली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना धक्का देण्याची तयारी देखील शिंदे यांनी केली होती.

शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना तर शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचे लोकसभा निवडणुकीला तिकीट कापण्यात आले होते. याचा फटका मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटका बसला होता.

त्यामुळे शिंदेंनी विधान परिषदेत दोन्हीही उमेदवार विदर्भातले देत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं. आता गवळी आणि तुमाने या दोन दिग्गज नेत्यांच्या विजयामुळे शिंदेंची ताकद विदर्भात वाढणार आहे.

Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane
Pankaja Munde Win : पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला; विधान परिषदेतून नवी इनिंग

तसेच मुख्यमंत्री शिंदे स्वत: यांनी महायुतीमधील महत्वाचे पक्ष,घटक पक्ष आणि समर्थक, अपक्ष आमदारांशी संपर्क ठेवून होते. महायुतीचे सर्व 9 उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची, याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली होती. त्यानुसार महायुतीतील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बैठका, चर्चा मुख्यमंत्री शिंदे करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane
Eknath Shinde : विधान परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन तयार, महाविकास आघाडीला देणार धक्का !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com