Shivsena-BSP Alliance : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट, शिवसेनेची-बहुजन समाज पक्षासोबत युती!

Amravati Politics Shiv Sena BSP Alliance : महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेन भाजपचे समर्थन केले होते, तर बसपाने दोन्ही पदांसाठी उमेदवार रिंगणात उभे केले होते. मात्र स्थायी समितीसाठी वेगळी गणितं समोर आली आहेत.
Ekanth Shinde
Ekanth Shinde sarkarnama
Published on
Updated on

Amravati Politics : अमरावतीमध्ये शिवसेना व बहुजन समाज पक्षाचा संयुक्त गट तयार झाल्याने महापालिकेतील स्थायी समितीसाठी उद्भवलेला सोळाव्या सदस्य निवडीचा पेच अखेर सुटला आहे. दोन्ही पक्ष मिळून 6 सदस्यांचा गट तयार होत असल्याने एक सदस्य या गटाचा स्थायीमध्ये जाऊ शकणार आहे. संख्याबळ कमी पडत असल्याने हा पेच निर्माण झाला होता. दरम्यान या शिवसेना-बसपा गटाच्या गटनेतेपदी डॉ. राजेंद्र तायडे यांची निवड करण्यात आली आहे.

महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे समर्थन केले होते, तर बसपाने दोन्ही पदांसाठी उमेदवार रिंगणात उभे केले होते. या निवडणुकीनंतर आता स्थायी समिती स्थापनेचे वेध लागले असून ही निवडणूक २० फेब्रुवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. 16 सदस्यीय स्थायी समितीमध्ये सभागृहातील संख्याबळानुसार भाजपचे सर्वाधिक 5 सदस्य जाणार आहेत. युवा स्वाभिमान व काँग्रेसचे प्रत्येकी 3, तर राष्ट्रवादी व एमआयएमचे प्रत्येकी 2 सदस्य जाऊ शकणार आहेत.

इतर पक्षाकडे असलेले संख्याबळ बघता त्यांना स्वबळावर सदस्य पाठवणे अशक्य आहे. शिवसेनेकडे व बहुजन समाज पक्षाकडे प्रत्येकी 3 सदस्यांचे संख्याबळ आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 व वंचित बहूजन आघाडीकडे 1 सदस्य आहे. सोळाव्या सदस्यासाठी 5 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. यातील एकाही पक्षाकडे तितके संख्याबळ नसल्याने सोळाव्या सदस्याचा पेच निर्माण झाला होता.

Ekanth Shinde
New Labour Law Update : कामगारांची चांदी; राज्य सरकारची मोठी घोषणा; आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम! कामगारांना मिळणार 3 दिवसांची भरपगारी सुट्टी

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने बहूजन समाज पक्षासोबत हातमिळवणी करीत संयुक्त गट तयार केला आहे. शिवसेना- बसपा, असे नामाकरण करीत या गटाची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आल्याची माहिती बसपाचे नगरसेवक सचिन वैद्य यांनी दिली. या संयुक्त गटाचे संख्याबळ 6 इतके झाल्याने या गटास 1 सदस्य स्थायी समितीमध्ये पाठविता येणार आहे. यामुळे सोळाव्या सदस्यासाठी निर्माण झालेला पेच सुटला आहे. दोन्ही गटातील सदस्यांना स्थायीमध्ये आलटून-पालटून प्रतिनिधित्व देण्यासोबतच विषय समित्यांसाठी तडजोड केल्या जाणार आहे.

बसपाला प्रथम संधी

शिवसेना- बसपा या संयुक्त गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून गटनेते म्हणून शिंदे सेनेचे डॉ. राजेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे या गटातील सहाही सदस्यांना डॉ. तायडे यांचा व्हीप बंधनकारक राहणार आहे. समिती निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात बसपाचा सदस्य स्थायी समितीत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Ekanth Shinde
Bhiwandi Mayor Election: भाजप लागली कामाला! आणखी एका महापालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com