Eknath Shinde : समृद्धी महामार्गाकडे निघालेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक मागे फिरला, कारण काय?

Eknath Shinde : ताफा पुन्हा नागपूरच्या दिशेने वळाला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरून अधिकाऱ्यासह समृद्धी महामार्गाकडे निघाले होते. मात्र त्यांचा ताफा आता ते परत मागे फिरलेले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सुरूवातीच्या पाँईंटपासून एक ते दिड किलोमीटर आधी मुख्यमंत्र्याचा ताफा पुन्हा मागे फिरला आहे. उद्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यासाठी ते मोंदींच्या दौऱ्यापूर्वी पाहणी करायला जाते होते. मात्र त्यांचा ताफा आता पुन्हा मागे वळला आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar : 'आपला 'हल्लाबोल' मोर्चा बघून सरकार पार हललंचं पाहिजे'

मुख्यमंत्र्यांचा ताफा पुन्हा मागे का वळाला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावरून निघाला होता. अडीच किलोमीटरचा प्रवास करून वर्धा रोडवरून ते महामार्गाच्या दिशेने निघाले होते. समृद्धी महामार्गाच्या सुरूवातीच्या पाँईंटपासून एक ते दिड किलोमीटर आधी मुख्यमंत्र्याचा ताफा पुन्हा मागे फिरला आहे. ताफा पुन्हा नागपूरच्या दिशेने वळाला आहे. नागपूरच्या जवळ असलेल्या एम्स हॉस्पिटलकडे हा ताफा निघाल्याची शक्यता आहे. उद्या पंतप्रधान मोदी एम्स हॉस्पिटललाही भेट देणार आहेत. या ठिकाणी ताफा निघाल्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com