Rajura property scam : वयाच्या 84 व्या वर्षी माजी आमदाराच्या पत्नीला नातेवाईकांनीच केलं बेघर; तब्बल 5 कोटींची फसवणूक, पेन्शनही लाटली...

Sumantai Mamulkar on Property Fraud : सुमनताई मामुलकर यांनी पती प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मदतीसाठी सख्ख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते आणि त्याची पत्नी शिल्पा भुते यांना आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले. सुरुवातीला त्यांनी विश्वास संपादन केला आणि नंतर हळूहळू घरातील आर्थिक व्यवहार स्वतःकडे घेतले.
Sumantai Mamulkar addresses a press conference in Rajura, alleging a ₹5 crore property fraud by close relatives and seeking legal action.
Sumantai Mamulkar addresses a press conference in Rajura, alleging a ₹5 crore property fraud by close relatives and seeking legal action.Sarkarnama
Published on
Updated on

Rajura News, 06 Jul : राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर यांनी त्यांच्याच जवळच्या नातलगांवर तब्बल पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विशेष म्हणजे, ही फसवणूक सख्ख्या बहिणीच्या मुलाने आणि त्याच्या पत्नीने केल्याचा दावा सुमनताई मामुलकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी पाच जणांविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या आरोपांमुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुमनताई मामुलकर यांचा आरोप काय?

पत्रकार परिषदेत बोलताना सुमनताई मामुलकर म्हणाल्या की, पती प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मदतीसाठी सख्ख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते आणि त्याची पत्नी शिल्पा भुते यांना आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले. सुरुवातीला त्यांनी विश्वास संपादन केला आणि नंतर हळूहळू घरातील आर्थिक व्यवहार तसेच बँकेची कामे आणि पेन्शनची जबाबदारी स्वतःकडे घेतली.

त्यांनी पुढे सांगितले की, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांची दरमहा ४० हजार रुपयांची पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा होत होती. मात्र, ही रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय अभिजित भुते यांच्या खात्याशी जोडण्यात आल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर बँकेकडे तक्रार करण्यात आली आणि संबंधित खाते बंद करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

मालमत्ता हस्तांतरित केल्याचा आरोप

सुमनताई मामुलकर यांच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२५ रोजी "जमीन खरेदी करायची आहे" असे सांगून त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात नेण्यात आले. तेथे अभिजित भुते, शिल्पा भुते यांच्यासह आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर हेही उपस्थित होते.

Sumantai Mamulkar addresses a press conference in Rajura, alleging a ₹5 crore property fraud by close relatives and seeking legal action.
Aurangabad district Bank : जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवणार? अब्दुल सत्तारांना दिलेल्या शब्द भाजप पाळणार का?

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी त्यांच्या नावावरील नऊ मालमत्तांबाबत तीन विक्रीखत आणि सहा बक्षीसपत्रे त्यांच्या नकळत करून घेण्यात आली. या मालमत्तांमध्ये अंतरगाव येथील शेती, सुबई येथील वसतिगृह व शेती, राजुरा येथील घर तसेच इतर स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व मालमत्तेची अंदाजे किंमत पाच कोटी रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.

"वयाच्या ८४ व्या वर्षी मला बेघर केले"

"जमीन खरेदी करायची असल्याचे सांगून माझ्याच मालमत्तेची कागदपत्रे माझ्या नकळत करून घेतली. वयाच्या ८४ व्या वर्षी मला बेघर करण्यात आले. अभिजित भुते, शिल्पा भुते, आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर यांनी संगनमत करून माझी फसवणूक केली.

Sumantai Mamulkar addresses a press conference in Rajura, alleging a ₹5 crore property fraud by close relatives and seeking legal action.
Ayodhya Ram Temple Donations: अयोध्येत राम मंदिरातील दानाबाबत मोठी माहिती समोर! भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी पाठवले जायचे हैदराबादला, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

संबंधितांवर कठोर कारवाई करून माझी मालमत्ता मला परत मिळवून द्यावी," अशी भावनिक मागणी सुमनताई मामुलकर यांनी पत्रकार परिषदेतून पोलीस आणि महसूल प्रशासनाकडे केली. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलीस आणि महसूल प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com