Vidharbha Politic's : सुनील केदारांना भाजपचा आणखी एक धक्का; दोनशे कोटींचा मालक असलेल्या कट्टर समर्थकाने हाती घेतले कमळ!

Sunil Kedar's supporter Join BJP : दोनशे कोटींची संपत्ती उघड झाल्याने ईडीने दुधराम सव्वालाखे यांनाही नोटीस बजावली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणि नागपूर जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक बघता सव्वालाखे यांनी भाजपत प्रवेश करून स्वतःला सुरक्षित केल्याचे मानले जाते.
Dudhram Savwalakhe joins BJP
Dudhram Savwalakhe joins BJPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 03 May : काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांच्या आणखी एका कट्टर समर्थकाला भाजपने फोडून आपल्या पक्षात घेतले आहे. रामटेक तालुक्यातील नगरधन सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करून आपले राजकीय भवितव्य सुरक्षित केले असल्याचे बोलले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत सुनील केदारांचे (Sunil Kedar) उजवे हात जमजले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, जिल्हा परिषदेचे सभापती उज्ज्वला बोढारे आणि आता सव्वालाखे या चार समर्थकांना भाजपने आपल्याकडे घेऊन केदारांना मोठा धक्का दिला होता.

दुधराम सव्वालाखे यांचा राजकीय प्रवास तसा अवघ्या पाचच वर्षांचा आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते उपनिबंधक पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे मालमत्तेचे विवरण बघून अनेकांना धक्का बसला. त्यावेळी ते दोनशे कोटींचे मालक होते, त्यामुळे सव्वालाखे सर्वच काँग्रेस (Congress) नेत्यांचे लाडके झाले होते. केदारांचे कट्टर समर्थक म्हणून ते जिल्ह्यात परिचित होते.

Dudhram Savwalakhe joins BJP
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर हे ‘त्या’ मेलमुळे व्यथित होते; पंधरा दिवसांनंतरही पोलिसांना सापडेना ठोस पुरावा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि केदार मंत्री असल्याने सव्वालाखे यांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या होत्या. त्यांनी जिल्हा परिषदेचा सभापती होण्यासाठी अनेक खटपटी केल्या. त्यांना काँग्रेसचा गटनेतासुद्धा व्हायचे होते. रामटेक विधानसभा मतदासंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. काँग्रेसने तिकीट दिले नाही, तर कुठल्याही पक्षाच्या झेंडा हाती घेण्याची त्यांची तयारी होती.

रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडला होता, त्यामुळे बंडखोरी करण्याची त्यांनी संपूर्ण तयारी केली होती. मात्र काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केले, त्यांनाही केदारांचे पूर्ण समर्थन असल्याने सव्वालाखे यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली हेाती.

Dudhram Savwalakhe joins BJP
Chhatrapati Sugar Factory : अजित पवारांचे बिनविरोधचे आवाहन धुडकावले; माजी आमदाराच्या नातवासह, माजी संचालकाने ‘छत्रपती’साठी शड्डू ठोकला

नोकरीत असताना सव्वालाखे यांच्या विरोधात काही तक्रारींची प्रकरणे समोर आली होती. यात प्रामुख्याने भूखंडांच्या खरेदी-विक्रीतील गैरव्यवहाराचे होते. त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत. दोनशे कोटींची संपत्ती उघड झाल्याने ईडीने दुधराम सव्वालाखे यांनाही नोटीस बजावली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणि नागपूर जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक बघता दुधराम सव्वालाखे यांनी भाजपत प्रवेश करून स्वतःला सुरक्षित केल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com