Chhatrapati Sugar Factory : अजित पवारांचे बिनविरोधचे आवाहन धुडकावले; माजी आमदाराच्या नातवासह, माजी संचालकाने ‘छत्रपती’साठी शड्डू ठोकला

Indapur Political News : छत्रपती बचाव पॅनेलचे प्रमुख तानाजी थोरात यांनी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ते म्हणाले, छत्रपती कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे.
Chhatrapati Sugar Factory Election
Chhatrapati Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune, 02 May : छत्रपती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन धुडकावून लावत छत्रपती बचाव पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनेलला कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांचे चिरंजीव, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, ज्येष्ठ नेते मुरलीधर निंबाळक यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप यांचे नातू करणसिंह हे विरोधी पॅनेलकडून छत्रपतीच्या रिंगणात उतरल्याने त्याला महत्व आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून कारखाना निवडणुकीच्या रिंगणात आता ४५ उमेदवार राहिले आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Sugar Factory) २१ जागांसाठी १८ मे रोजी होत असून २० मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या सर्वपक्षीय पॅनेलचे २१ उमेदवार आहेत. छत्रपतीचे माजी संचालक तानाजी थोरात प्रमुख असलेल्या छत्रपती बचाव पॅनेलने १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, इतर आठ अपक्षही निवडणूक लढवत आहेत.

Chhatrapati Sugar Factory Election
Chhatrapatil Sugar Factory 'छत्रपती'च्या निवडणुकीत डावलल्याने पवारांच्या पक्षाचा मोठा निर्णय; ‘आम्ही योग्य उमेदवाराला....’

छत्रपती बचाव पॅनेलचे प्रमुख तानाजी थोरात यांनी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ते म्हणाले, छत्रपती कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. कारखान्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन पॅनेल तयार केला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत छपत्रीकडून पाचशे ते सातशे रुपये भाव कमी मिळत आहे, त्यामुळे नाराज सभासदांनी निवडणूक आता आपल्या हाती घेतली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारीसाठी गर्दी झाली होती. आमचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे, असा असा आरोप छत्रपती बचाव पॅनेलचे प्रमुख तानाजी थोरात यांनी केला आहे. पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचाही त्याला पाठिंबा असावा. पण या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, दादागिरी आणि दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, असेही तानाजी थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

Chhatrapati Sugar Factory Election
Solapur News : सोलापुरात आमदारपुत्राच्या गाडीने घेतला अचानक पेट; प्रसंगावधान राखल्याने दुर्घटना टळली

छत्रपती बचाव पॅनेलचे १६ उमेदवार

गट क्रमांक -१ संजय सोमनाथ निंबाळकर, प्रताप मोहन पवार

गट क्रमांक - २ संग्राम दत्तात्रेय निंबाळकर, अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर

गट क्रमांक - ३ करणसिंह अविनाश घोलप, तानाजी साहेबराव थोरात

गट क्रमांक - ४ राजेंद्रकुमार बलभीम पाटील, बाबासाहेब भगवान झगडे

गट क्रमांक -५ रवींद्र भीमराव टकले,

गट क्रमांक - ६ नितीन अशोक काटे

ब वर्ग - सत्यजित भाऊसाहेब सपकळ

अनुसुचित जाती जमाती- बाळासाहेब उर्फ भाऊसाहेब गुलाब कांबळे.

महिला राखीव - सीता रामचंद्र जामदार, पद्मजा विराज भोसले

इतर मागास प्रवर्ग- संदीप वसंतराव बनकर

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग- तुकाराम गणपत काळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com