

Gadchiroli health department : गडचिरोलीच्या जिल्हा सर्जन डाॅ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.
पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. लहाडे यांची डिसेंबर 2025 मध्ये गडचिरोलीच्या (Gadchiroli) जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाली होती. सरकारच्या आदेशानुसार त्यांना निलंबन काळात मुख्यालय गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हजर राहावे लागणार आहे. परंतु याकाळात डाॅ. लहाडे यांची विभागीय चौकशी सुरू राहणार आहे.
अहेरीतील डॉक्टरांचे (Doctor) राजीनामे, चामोर्शी येथील माता-बाळ मृत्यू प्रकरण, पंचायत समिती माजी सदस्य अमिता मडावी यांनी नागपूर उपसंचालक आरोग्य यांच्या दालनात केलेले आंदोलन आणि इतर वाढत्या तक्रारींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. लहाडे यांच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. यानंतर सरकारने डाॅ. लहाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. डॉ. लहाडे यांच्या सेवाकाळातील नाशिक येथील प्रकरणाची पार्श्वभूमी या कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 2017मध्ये 24 आठवड्यांच्या गर्भाच्या कथित बेकायदा वैद्यकीय गर्भपाताच्या प्रकरणात त्यांच्यावर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली होती. त्यांच्यावर एमटीपी कायदा, पीसीपीएनडीटी कायदा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.