Congress Crisis : काँग्रेसने भाकरी फिरवताच राजकीय भूकंप! शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; दिल्ली गाठण्याचाही कार्यकर्त्यांचा इशारा

Congress Faces Internal Crisis In Gadchiroli Over Leadership Change Controversy : गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवताच वादाला तोंड फुटले असून शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे निशान फडकवले आहे.
Gadchiroli Congress Crisis
Gadchiroli Congress Crisissarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli News : काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यात भाकरी फिरवताच राजकीय भूकंप झाला आहे. नवे जिल्हाध्यक्ष एड. विश्वजित कोवासे यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून महेंद्र ब्राम्हणवाडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर या बदलामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना मुंबईतील टिळक भवनात भेटून शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या बंडामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

तर न्याय न मिळाल्यास दिल्ली जाऊ असाही इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट पक्ष संघटनेलाच दिला आहे. तसेच संघटनेला उभारी देणाऱ्या नेतृत्वाला डावलून केलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेतृत्वा विरोधात उघड बंड पुकारले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियान सुरू केले असून या अंतर्गत अनेक जिल्ह्यात भाकरी फिरवण्यात आली आहे. अशाच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातही काँग्रेसने बदल करत महेंद्र ब्राम्हणवाडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केले. तर त्यांच्या जागी अॅड. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती केली. याच नियुक्तीवरून आता वाद सुरू झाला आहे.

Gadchiroli Congress Crisis
Congress Crisis : काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, जिल्हाध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी, 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने खळबळ

या निर्णयाच्या निषेधार्थ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेतृत्वा विरोधात उघड बंड पुकारत हा निर्णय जमिनीवरील वास्तवाशी विसंगत असल्याचा दवा केला आहे. तसेच पक्षाने संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व बाजूला सारत कोवासे यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत शेकडोंनी राजीनामे दिले आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांनी, नेतृत्वाला इशारा देत, गडचिरोली जिल्ह्यात २०१४ ते २०२४ या कालावधीत काँग्रेस शेवटच्या घटका मोजत असताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मोट बांधली. त्यांना एकत्र करत सोबत घेऊन पक्षाला नवसंजीवनी दिली. सातत्याने शेतकरी, युवक, महिला, पर्यावरण व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा रस्त्यावर आणली.

त्यांनी केलेल्या या कामाची पोचपावती म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे खासदार आणि विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून आहे. पण आता त्यांच्या कामाची अशा पद्धतीने पक्ष त्याची परतफेड करत असल्याचा रोष व्यक्त केला जातोय.

Gadchiroli Congress Crisis
Congress crisis Kerala : केरळ सीएम पदाचा पेच वाढला; सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून ‘फायरफायटिंग’ची जबाबदारी

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. तरीही येथे पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर एकाच समाजाला प्रतिनिधित्व दिले जात आहे. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वापासून डावलले जात असल्याचा आरोप देखील यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com