गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला दहा हजारांची लाच घेताना अटक

नयना गुंडे (Nayana Gunde) यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेमन (Rajesh Memon) यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना पकडले.

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला दहा हजारांची लाच घेताना अटक
सरकारनामा
Published on
Updated on

गोंदिया : गोंदियाच्या जिल्हाधिकारी (Gondia District Collector) नयना गुंडे (Nayana Gunde) यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेमन (Rajesh Memon) यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची केलेली ही पहिलीच घटना आहे.

तक्रारदाराचे हार्डवेअर व भांडे विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नुतनीकरण व हस्तातंरण करण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेमन यांनी यासाठी 10 हजाराची मागणी केली होती. काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चलन पावती जमा केली होती. मात्र, फिर्यादी हे परवाना हस्तांतरण करीता विचारपूस करायला आले असता मेमन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली.


गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला दहा हजारांची लाच घेताना अटक
पार्थ पवार म्हणतात 'सिर्फ हंगामा नही'...तरी हंगामा होणारच!

मात्र, तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्वीकारतांना पकडण्यात आले. याप्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपी राजेश मेमन याला ताब्यात घेतले आहे.

प्राध्यापक व्हायचयं ? UGC कडून महत्वाची घोषणा

पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदाच्या (Assistant Professor) थेट भरतीसाठी आता जुलै २०२३ पर्यंत पीएचडी अनिवार्य (PhD) नसणार आहे. यामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाऊ शकणार आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यूजीसीने (UGC) विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीची अनिवार्य आवश्यकतेसंबंधी तारीख वाढवली आहे. दिल्ली विद्यापीठ शिक्षक संघाने (DUTA) या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय विद्यापीठाच्या विविध विभागातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा आहे. यूजीसीने याबाबत सूचना जारी केली आहे. त्यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १ जुलै २०२१ पासून विद्यापीठांच्या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीच्या अनिवार्यतेबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com