BJP party entry : भाजपमध्ये होणार स्ट्रॉंग इनकमिंग : संकेत देत फडणवीसांनी घाबरलेल्या निष्ठावंतांनाही समजावलं

Devendra Fadnavis News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
Devendra-Fadnavis
Devendra-FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या इनकमिंगमुळे पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण देखील पसरल्याचे पाहायला मिळत आहे. इनकमिंग न करता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी मागणी कुठेतरी होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनकमिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणुकांना सामोरे जाताना कशा पद्धतीने रणनीती आखावी तसेच स्वबळावरती का महायुतीमध्ये निवडणूक लढवावी? पक्षांमध्ये कोणत्या नेत्यांना प्रवेश द्यावा? याबाबत चर्चा झाली.

Devendra-Fadnavis
Shivsena- BJP News : सत्तेत एकत्र पण मनं जुळलीच नाही; स्थानिकसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा, शिवसेनेला मात्र हवी युती!

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी रवींद्र चव्हाण महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचा दौरा ठरवलेला आहे. दौऱ्यात विभागातील महानगरपालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद याचा आम्ही आढावा घेत आहोत. पुण्यात पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला. यानंतर कोकण विभागाचा आढावा मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे.

Devendra-Fadnavis
Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

मागच्या निवडणुकीत आणि आता काय परिस्थिती होती, युती संदर्भात आम्ही आढावा घेतला. अडचणी समजून घेतल्या. पक्षाची संघटना म्हणून बूथ रचना, निवडणुकीचे संघटनाबाबत चर्चा करून पुढील निर्देश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यात मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. सकारात्मक अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Devendra-Fadnavis
Yogesh Kadam : घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना प्रकरण तापलं; अडचणीत आलेल्या योगेश कदमांनी अंग झटकत दाखवले पोलीस आयुक्तांकडे बोट

युतीच्या संदर्भात आम्ही आमचे अधिकार जिल्ह्यांना दिले आहेत. शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, असे आदेश दिलेत. शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढू पण, मित्र पक्षांवर टोकाची टीका करायची नाही. परिस्थितीप्रमाणे आमचे नेते चर्चा करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra-Fadnavis
NCP Politic's : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षांना भलताच कॉन्फीडन्स; केला ‘हा’ दावा...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पक्षप्रवेशांबाबत विचारला असता फडणवीस म्हणाले, 'भाजपमध्ये कोणताही स्ट्रॉंग कार्यकर्ता आला तर त्याला घेण्याची आमची भूमिका आहे. साधारणपणे भाजपमध्ये आमचे कार्यकर्ते लोकांना सामावून घेण्याच्या भूमिकेत असतात. त्यामुळेच भाजप मोठा झाला आहे. नाराजी देखील निर्माण होते. त्या ठिकाणी आम्ही त्यांना समजावतो आणि ते समजून देखील घेतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra-Fadnavis
Anil Parab: योगेश कदमांविरोधात अनिल परब पुन्हा मैदानात : घायवळ प्रकरणात थेट PM मोदींचं नाव घेत फडणवीसांनाही पकडलं कोंडीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com