Gondia Political News : मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर, राष्ट्रवादीच्या आमदारानं गाठलं थेट मंत्रालय !

Yashwant Chandrikapure Meet Ajit Pawar : अजित पवारांनी संबंधित आमदारांच्या मतदारसंघातील आरोग्यसमस्यांची घेतली दखल...
Yashwant Chandrikapure Meet Ajit Pawar
Yashwant Chandrikapure Meet Ajit PawarSarkarnama

अभिजीत घोरमारे -

Gondia : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, वैद्यकीय अधिकारी व स्थायी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या आरोग्य समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी थेट मंत्रालयच गाठले.

तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी मतदारसंघातील आरोग्यसमस्येविषयी चर्चा केली. या भेटीत अजित पवारांनी आमदारांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेत मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही चंद्रिकापुरे यांना दिला.

Yashwant Chandrikapure Meet Ajit Pawar
Rohit Pawar Nagpur Daura : 'साहेबांचा संदेश' घेऊन रोहित पवार विदर्भात; प्रफुल्ल पटेलांच्या गडालाही सुरुंग लावणार ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी मतदारसंघातील दखल घेत अधिकाऱ्यांची बैठक लावली. यावेळी मंत्रालयातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील आरोग्य समस्यांसंदर्भात होत असलेल्या सरकारच्या दुर्लक्षाकड़े लक्ष वेधले. यानंतर मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास घेऊनच आमदार मनोहर चंद्रिकापुरे (Manohar Chandrikapure) यांनी परतले.

मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, वैद्यकीय अधिकारी व स्थायी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दोन्ही रुग्णालयात ३० खाटांवरून १०० खाटा करून श्रेणीवर्धन करण्याचा १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आयुक्तालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्याविषयी कळविण्यात आले, मात्र, अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. याकडे आमदार चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले. इळदा व चिखली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षे लोटली. अद्याप या आरोग्य केंद्रासाठी कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही. इमारतींचे लोकार्पण होऊ शकले नाही.

इमारतीतील विद्युतीकरणाची लोकार्पणापूर्वीच तुटफुट झाली आहे. नवीन विद्युतीकरणाचा प्रश्न कायम आहे. ही दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासंदर्भात आमदार चंद्रिकापुरे यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, अजित पवार यांच्याकडूनही आश्वासन मिळाल्याने आरोग्य समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Yashwant Chandrikapure Meet Ajit Pawar
Assembly Election Survey : मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये कुणाचं सरकार येणार; काय सांगतो ताजा सर्व्हे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com