Nagpur Firing : गोळीबार प्रकरणात गडचिरोली डेप्युटी आरटीओंची सहा तास चौकशी

Gita Sejwal Case : पोलिसांना न कळविता संकेत गायकवाड यांना परस्पर नेले दवाखान्यात
RTO Gadchiroli.
RTO Gadchiroli.Sarkarnama

Financial Dispute : आर्थिक वादातून आरटीओ निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy. RTO) विजय चव्हाण व त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती चव्हाण यांची सहा तास चौकशी करण्यात आली. संकेत गायकवाड यांच्यावर आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांनी गोळी झाडल्यानंतर चव्हाण त्यांना नागपूरच्या धंतोलीतील एका इस्पितळात घेऊन गेले होते.

विजय चव्हाण यांनी पत्नी डॉ. ज्योती चव्हाण यांच्या मदतीने संकेत गायकवाड यांना वैद्यकीय उपचार करायला लावले. या संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास आता नागपूर पोलिस करीत आहे. सुमारे सहा तास चव्हाण दाम्पत्याची चौकशी झाल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे. चौकशीत चव्हाण दाम्पत्याने गायकवाड यांना केवळ उपचारासाठी इस्पितळात दाखल केल्याचे सांगितले.

RTO Gadchiroli.
Nagpur Firing : आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरटीओ अधिकाऱ्यांमधील फायरिंगची घटना

घटना कशी घडली व त्यामागे नेमके कोणते कारण होते, हे आपल्याला ठाऊकच नव्हते, असे चव्हाण दाम्पत्याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे नागपूर पोलिस म्हणाले. सुमारे सहा तासांत पोलिसांनी संकेत गायकवाड, गीता शेजवळ यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न चव्हाण यांना विचारल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर संकेत गायकवाड यांनीच आपल्याला मोबाइलवर संपर्क साधला. उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची विनंती केली, असे चव्हाण यांनी पोलिसांना सांगितले.

संकेत गायकवाड यांना गोळी लागल्याची माहिती चव्हाण यांना नव्हती का? होती तर वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी तत्काळ पोलिसांना किंवा परिवहन विभागात उच्चस्तरावर का कळविले नाही. गोळीबाराबद्दल चव्हाण यांना संशय आला नाही का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेजवळ यांचा जामीन फेटाळला

प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड (रा. सेंट्रल बाजार रोड, नागपूर) यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी आता शेजवळ यांना अटक करण्यासाठी तयारी चालविली आहे. नागपूर पोलिसांचे पथक नगरकडे रवाना झाले आहे.

संकेत गायकवाड यांच्याविरोधात गोळीबारानंतर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. गायकवाड यांची चौकशी करण्याच्या 48 तासांपूर्वी पोलिसांनी त्यांना नोटीस द्यावी, असेही कोर्टाने म्हटले आहे. संकेत गायकवाड हे सध्या पुण्यातील एका इस्पितळात दाखल आहेत. 7 मे 2022 रोजी गायकवाड यांच्या घरी शेजवळ यांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती. आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याचे तपासात आढळले आहे.

RTO Gadchiroli.
Took bribes from RTO : गीता शेजवळ अद्यापही फरारच; निवासस्थानांची घेतली झडती !

पोलिस आयुक्तांमुळे उलगडले सत्य

संकेत गायकवाड यांची पायावरून उंदीर गेल्याने ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’खाली पडले व त्यातून गोळी सुटल्याचे म्हटले होते. ही गोळी गायकवाड यांच्या दोन्ही पायांच्या मांडीतून गेली होती. बजाजनगर पोलिसांनी याप्रकरणी केवळ साधी नोंद घेतली होती. तपास मात्र केला नव्हता. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना हे प्रकरण संशयास्पद असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखा पोलिसांना याबाबत तपास करण्याचे आदेश दिले.

गुन्हे शाखा पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केल्यानंतर एकएक करीत यातील गुंतागुंत सुटत गेली. शेजवळ यांनीच गायकवाड यांच्यावर गोळी झाडल्याचे तपासात आढळले. त्यामुळे पोलिसांनी गायकवाड आणि शेजवळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. भक्कम पुरावे गोळा झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने शेजवळ यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.

RTO Gadchiroli.
Nagpur RTO : महिला निरीक्षकाने झाडली दुसऱ्यावर गोळी; कारण अद्यापही गुलदस्त्यात

न्यायालयात शेजवळ यांच्या वकिलांनी तपास बंद करण्यात आल्याचा उल्लेख केला. मात्र सरकारी वकिलांनी तपासानंतर पुढे आलेले तथ्य न्यायालयापुढे मांडले. सरकारी व शेजवळ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेजवळ यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पोलिसांनी शेजवळ यांना शोधण्यासाठी पथके नेमली आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R...

RTO Gadchiroli.
Nagpur RTO : नागपूरमध्ये आरटीओ अधिकारी बदल्यांचे रॅकेट? पंचतारांकित हॉटेलमध्ये काय शिजलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com