Iran Vs USA, Israel War: नागपूरचे पर्यटक दुबईत अडकले! चिकटे अन् घारफेंडे कुटुंबातील 9 जणांची महाराष्ट्र सरकारकडं याचना; काय आहे परिस्थिती?

Iran Vs USA, Israel War: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध पेटलं असून सातत्यानं इराणकडून अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर हल्ले केले जात आहेत. दुबईतील अनेक तळं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
Iran_USA, Israel Conflict
Iran_USA, Israel Conflict
Published on
Updated on

Iran Vs USA, Israel War: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध पेटलं असून सातत्यानं इराणकडून अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर हल्ले केले जात आहेत. तसंच दुसरीकडं अमेरिका आणि इस्रायलकडून इराणमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प टार्गेट करण्यात आले आहेत. अमेरिकेनं डागलेल्या एका क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं हे युद्ध भडकण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, दुबईत झालेल्या अनेक क्षेपणास्र हल्ल्यांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून दुबईतील विमानतळं बंद करण्यात आली आहेत, त्यामुळं तिथं नागपूरचे ९ पर्यटक अडून पडले आहेत, या पर्यटकांनी महाराष्ट्र शासनं आणि केंद्र शासनाकडं मदतीची याचना केली आहे. त्याचबरोबर दुबईत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे याची माहितीही दिली आहे.

Iran_USA, Israel Conflict
Sanjay Kenekar: महाराष्ट्रात देवाभाऊंचं राज्य! कायदा मोडेल, त्याचं कंबरडं मोडू; संजय केणेकरांचा एमआयएमला इशारा

इराण-अमेरिका, इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईत नागपूरचे चिकटे आणि घारफेंडे अशा दोन कुटुंबातील ९ जण अडकून पडले आहेत. हे सर्वजण एका ट्रॅव्हल एजन्सीच्यामार्फत पर्यटनासाठी दुबईला गेले होते. यांपैकी बबलू चिकटे यांनी व्हिडिओ बनवून आपलं कुटुंब दुबईत अडकून पडल्याची माहिती दिली आहे. तसंच महारष्ट्र सरकारकडं त्यांनी मदतीची याचना केली असून तिथली सध्याची परिस्थिती कशी आहे हे सांगताना सध्यातरी सर्व सोय एका हॉटेलमध्ये असली तरी आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परतायचं आहे, असं साकडंही त्यांनी केंद्र सरकारला घातलं आहे.

Iran_USA, Israel Conflict
Fadnavis Government : सरकारचा ‘फ्रूट वाईन’ फॉर्म्युला! आता द्राक्ष-आंबा-काजू-चिक्कूसह सर्व फळांच्या वाईनला अनुदान; कोकणात नवी संधी

अडकलेल्या पर्यटकांपैकी बबलू चिकटे म्हणाले, "नागपूरचे पर्यटक दुबईमध्ये अडकले आहेत. नागपुरची चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जण दुबईत अडकले आहेत. पर्यटनासाठी आखाती देशात गेल्यावर 3 मार्चला विमानाने परत यायचे होतं. मात्र, विमानतळ बंद केल्यानं आम्ही दुबई शहरात अडकून पडलो आहोत. हॉटेलमधून बाहेर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. पण हॉटेलकडून नाश्ता, जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर, अमरावती आणि यवतमाळ येथील 27 जण दुबईत आहेत. सातत्यानं इथं मिसाईलचे हल्ले होत असल्यानं सर्वत्र घबराटीचं वातावरण तयार झालं आहे, असंही बबलू चिकटे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com