Kamthi Politics : सुलेखा कुंभारे यांनी गंभीर आरोप करताच बावनकुळेंच्या बचावासाठी भाजपची दलित आघाडी मैदानात

Chandrashekhar Bawankule vs Sulekha Kumbhare : 'बौद्ध समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. आरोप करीत असताना कुंभारे यांनी दोन समाजातील सामाजिक दरी विस्तारू नये अशी विनंतीही यावेळी मेश्राम यांनी केली. कामठीमध्ये ड्रॅगन पॅलेस उभारण्याचे सुलेखा कुंभारे यांचे स्वप्न होते.'
Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Chandrashekhar Bawankule, Sulekha KumbhareSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 05 Dec : कामठी नगर पालिकेच्या जागा वाटपावरून भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या तथा माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे.

दोन्ही बाजूने आरोप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कुंभारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची दलित आघाडी मैदानात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करण्यापेक्षा ड्रॅगन पॅलेसमध्ये बसून चिंतन करण्याचा सल्ला सुलेखाताईंना दिला आहे.

सुरेखा कुंभारे यांनी कामठीच्या निवडणुकीत मतचोरी झाली, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराच्या फार्म हाऊसवरून पैशाचे वाटप केले असा आरोप करून हे सर्व बावनकुळे यांच्या पुढाकाराने झाल्याचा आरोप केला आहे. यावर मेश्राम म्हणाले, 'हे खरे असेल तर कुंभारे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करावी. कायदेशीर मार्ग सोडून त्या जनतेसमोर आरोप करीत आहेत.

Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Tapovan Tree Cutting Controversy : 'वृक्षतोड हा धर्माचा विषय नाही, टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला...'; ठाकरेंच्या नेत्याने नितेश राणेंची अक्कलच काढली

त्या सोशल माध्यमांवरून बावनकुळे यांची बदनामी करीत आहेत. त्यांची माहिती खरी असेल तर त्या तक्रार का करीत नाही? त्यांचा हेतू वेगळा दिसतो. त्या कामठीच्या नेत्या आहेत. मात्र आता मतदार त्यांच्यासोबत नाही. हक्काचा मतदार दुरावत चालल्याने त्या आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाजप नेत्यांवर आरोप करीत असल्याचे दिसून येते. त्या महायुतीत राहाणार असतील तर आम्हाला आनंदच आहे.

मात्र त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असले तर भाजपचे काही बिघडत नाही. बौद्ध समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. आरोप करीत असताना कुंभारे यांनी दोन समाजातील सामाजिक दरी विस्तारू नये अशी विनंतीही यावेळी मेश्राम यांनी केली. कामठीमध्ये ड्रॅगन पॅलेस उभारण्याचे सुलेखा कुंभारे यांचे स्वप्न होते. त्याकरिता नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मोठी मदत केली.

Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Sangamner Railway Route Demand : तांबे अन् खताळ इकडून भिडण्याच्या तयारीत; तिकडं अश्विनी वैष्णवांची मार्ग बदलण्याची घोषणा

पॅलेसच्या परिसर विकसित करून दिला. त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण केली. त्यांचे स्वप्नही पूर्ण केले. मात्र आता नगरपालिकेच्या छोट्या निवडणुकीवरून त्यांनी भाजपला शिव्याशाप देणे सुरू केले आहे. हे बघता त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले असल्याचे दिसून येते. त्यांचा सर्व जीव कामठी नावाच्या पोपटात अडकला आहे. आपले अस्तित्व राखण्यासाठी त्यांनी कामठी नगरपालिकेच्या निवडणुकीचा वापर केला.

त्यांचा उमेदवार मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर उभा होता. सुमारे साडेतीन हजार मतांनी तो पराभूत झाला. असे असताना त्याला पुन्हा नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यासाठी हट्ट धरला. पराभूत उमेदवार आणि निवडणूक येण्याची क्षमता नसल्याने भाजपने त्यांची मागणी फेटाळून लावली असल्याचे धर्मपाल मेश्राम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com