थोडक्यात बातमी
वरोरा, चंद्रपूर येथे “जिल्हा प्रमुखपद विक्रीला” अशा आशयाचे होर्डिंग झळकल्याने माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे नेतृत्वावर पद‑तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला.
तिवारींचा आरोप—ज्या लोकांना गृहनिर्माण सोसायटी किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवता आला नाही त्यांनाच मोठमोठी पदे देऊन ‘ठाकरे ब्रँड’चा बाजार मांडला
हीच पद्धत राहिली तर गावगुंड, खंडणीखोरही जिल्हा प्रमुख होतील, असा तिवारींचा इशारा.
.
Kishor Tiwari VS Sanjay Raut : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुखपद विक्रीस उपलब्ध आहे, असे होर्डिंगलावून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला जात आहे. या खरेदी-विक्रीमुळेच अनेकांना बाहेर पडावे लागले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
ठाकरेंच्या पक्षात तिकीट विक्री व पद विक्रीच्या प्रकारावर आपण यापूर्वीच व्यथा मांडली होती. त्यामुळेच आपली प्रवक्तापदावरून हलाकलपट्टी केल्याचा दावा माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे. जे गृहनिर्माण सोसायटीची निवडणूक जिंकू शकले नाही, ग्रामपंचायतच्या निवडणूक ज्यांना जिंकता आली नाही ते मोठमोठ्या पदावर बसले आहेत. हे बघता ठाकरे ब्रँड विक्रीला काढला असल्याचे सांगून तिवारी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांबाबत परखड मत व्यक्त केले होते. त्यांनी थेट संजय राऊत यांनाच टार्गेट केले होते. त्यानंतर त्यांची प्रवक्तापदावरून हकलापट्टी करण्यात आली होती. आता चंद्रपूरमध्ये झळकलेल्या होर्डिंगवरून त्यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त केली.
शेतकरी आंदोलक म्हणून किशोर तिवारी यांना ओळखले जाते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकाडा सर्वप्रथम त्यांनी जाहीर करणे सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबनी मिशन स्थापन केले होते. त्या मिशनचे किशोर तिवारी अध्यक्ष होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या तिवारी यांची शिवसेनेचे प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. तिवारी हे अनेक डिबेटमध्ये सहभागी होऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे जोरदार बाजू मांडत असत. खासकरून हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांवर ते दमदार बोलत होते. पंतप्रधान मोदी असो वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ते सडेतोड टीका करीत असत.
जे होर्डिंगवर झळकले ते आपण पाच सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते आणि त्यात सत्यता आहे. आपल्यावर पक्षाने कारवाई केली मात्र जे पोटभरू व्यावसायिकांचा गोतावळा उद्धव सेनेते आहे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा रोष तिवारी यांनी व्यक्त केला.
याच कारणामुळे मागील २५ ते ३० वर्षापासून संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी खर्ची घालणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आज विदर्भात तसेच मराठवाड्यात ज्यांना घरचे लोक मतदान करीत नाहीत, जे गह निर्माण सोसायटी किंवा ग्राम पंचायत स्तरावर निवडणूक जिंकू शकत नाही, अशा नेत्यांना मोठमोठ्या पदावर नियुक्त केले जाते. उद्धव ठकरे सेनेतील काही नेत्यांनी पदांचा बाजार मांडला असल्याचा हल्लाबोल तिवारी यांनी केला.
ठाकरे ब्रँड त्यांनी विक्रीला काढला आहे. हे असेच सुरू राहिले तर उद्या गावगुंड, दारूचे गुत्तेवाले, खंडणीखोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख होतील, असे सांगून किशोर तिवारी यांनी आपला सर्व रोष शिवसेनेचे नेते व प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला.
प्रश्न - वरोऱ्यातल्या होर्डिंगवर नेमकं काय आरोप करण्यात आला?
उत्तर - जिल्हा प्रमुखपद विक्रीस उपलब्ध असल्याचा उघड आरोप करून उद्धव सेनेतील पदवाटप पैशांनी चालत असल्याचे सूचित केले.
प्रश्न - किशोर तिवारी संजय राऊतांवर का टीका करत आहेत?
उत्तर - त्यांच्या मते पद‑तिकीट विक्रीच्या संस्कृतीला राऊतांनी मूक समर्थन दिले किंवा थांबवले नाही, त्यामुळे ‘ठाकरे ब्रँड’ बदनाम होत आहे.
प्रश्न - तिवारींची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी कशाशी जोडली जाते?
उत्तर -स्वतःच्या पक्षातील विक्रीप्रवृत्तीविरोधात आवाज उठवल्याची शिक्षा म्हणून आपल्याला बाजूला केले, असा तिवारींचा दावा आहे.
प्रश्न - तिवारी कोणता मोठा धोका अधोरेखित करतात?
उत्तर - हीच स्थिती सुरू राहिली तर अयोग्य, गुंडाळकीशी संबंधित लोकही जिल्हा प्रमुख होतील आणि पक्षाची विश्वसनीयता कोसळेल, असा इशारा ते देतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.