Medical College : आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा!

Kishore Jorgewar : वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
Government Medical College Chandrapur.
Government Medical College Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विविध कारणांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेनेच हे दालन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेल्या गर्भित इशाऱ्यानंतर चर्चेत आले आहे. सोनोग्राफी यंत्राच्या मुद्द्यावरून आमदार जोरगेवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी 15 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून द्या, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असे ठणकावत आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

Government Medical College Chandrapur.
Chandrapur : अख्ख्या गावाने केली पोलिस अधिकाऱ्यावर पुष्पवृष्टी, कारण...

शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत उईके, डॉ. जीवने यांच्यासह अनेक महाविद्यालयातील अनेकांची उपस्थिती होती.

चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसह लगतच्या अनेक जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. तेलंगणातूनही अनेक रुग्ण चंद्रपुरात येतात. त्यामुळे शासनाच्या आरोग्यव्यवस्थेवर मोठी जबाबदारी आहे. अशावेळी आपणही ही जबाबदारी घेतली पाहिजे, असे जोरगेवारांनी डॉक्टरांना सांगितले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कर्मचारी सौजन्याची वागणूक देत नाहीत. असे अनेक प्रकार समोर आले आहेत. हा प्रकार चांगला नाही. रुग्णांशी व रुग्णांच्या नातेवाईकांशी वागणूक चांगली ठेवा, असेही जोरगेवार यांनी सर्वांना बजावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, वाॅर्डातील लाइट व पंखे बंद असल्यास ते तत्काळ दुरुस्त करावे, रुग्णांवर परिपूर्ण उपचार केला जावा, वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यास बाध्य करणारे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही, अशी सक्त सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य प्रशासनाला केली.

अनेकदा गंभीर रुग्ण रात्री उपचारासाठी रुग्णालयात येतात. पण त्यावेळी डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या जिवाचे बरे-वाईट होण्याची शक्यता असते. हा प्रकार गंभीर आहे. जे डॉक्टर रात्रपाळीत कर्तव्यावर असतात त्यांनी अतिशय गंभीरतेने हा मुद्दा लक्षात घ्यावा. रुग्णालयात रक्तदात्यांची नावे ठळकपणे लावावीत, अशी सूचना किशोर जोरगेवार यांनी केली.

Government Medical College Chandrapur.
Chandrapur Congress : शंतनू धोटेंच्या उमेदवारी अर्जाचा अर्थ नेमका काय?

आमदार जोरगेवार यांनी बैठकीत रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेताच हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चंद्रपूरची आरोग्य यंत्रणा तशी भक्कम आहे. पण नियोजनाअभावी येथे अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेकदा त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होतो. रुग्ण गंभीर असताना त्यांच्या नातेवाईकांशी कुणी नीट बोलत नसेल तर असले हे प्रकार अजिबातच खपविले जाणार नाहीत, असा इशारा आमदार जोरगेवार यांनी दिला.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Government Medical College Chandrapur.
Chandrapur APMC : उपसभापतिपदासाठी जोरदार ‘फिल्डिंग,’ पिंपळकर-फरकडे आमने-सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com