Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत नापिकीला समोर जावे लागत आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांभोवती संकटाचा फास घट्ट होत आहे. बळीराजा हतबल झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील वाई-रूई येथील शेतकरी कुणाल जतकर यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहून मागणी केली आहे.
नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) नुकतेच झाले. विदर्भातील शेतकऱ्यांना या अधिवेशनातून सरकार भरीव मदत करेल, अशी आशा होती. पण ती फोल ठरली. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. शेतकरी शेतात काबाडकष्ट करतात. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे याच शेतकऱ्यांना योग्य चटणी आणि भाकरीही नशिबात येत नाही. (Farmer)
जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात झालेले असताना सुद्धा सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. गतकाळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हाती आलेली बहुतांश पिके वाया गेली. तर उर्वरित काळात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे पिके करपून गेली.
दरम्यान, या काळामध्ये पंतप्रधान पिक विमा (Crop Loan) योजनेअंतर्गत या पिकांचे नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, पीक विमा कंपन्यांकडून सर्व पिकांचे सर्वेक्षण न झाल्याने बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. तर शासनाकडून जाहीर झालेल्या हमी भावांपेक्षा अत्यल्प दरात शेती मालांची खरेदी होत नसल्याने शेती गुंतवणुकीपेक्षा उत्पन्नात तफावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कुठे शेतात दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागली आहे.यांसह अनेक समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
अशातच यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र थांबत नाही आहे . शिवाजी महाराजांनी कोणी शेतकऱ्यांच्या पिकाला धक्का जरी लावला तर हात कलम करण्याची शिक्षा देण्याचे काम करीत होते .तर राज्य आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना मारण्याचे काम करत आहे,असा आरोप कुणाल जतकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर लावला .
शेतमालाला भाव नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि शेतकर्यांना न्याय द्या अशा आशयाचे पत्र कुणाल जतकर यांनी स्वतःच्या रक्ताने मुखमंत्र्यांना लिहिले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.