Lok Sabha Election 2024 : नवनीत राणा की बळवंत वानखेडे, 'प्रहार' कुणावर?

Amaravati Lok Sabha Constituency : अमरावतीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यात थेट लढत झाली. पण, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या एन्ट्रीनं निवडणूक रंगतदार झाली.
navneet rana balwant wankhede dinesh boob
navneet rana balwant wankhede dinesh boobsarkarnama

Amaravati News, 24 May : अमरावती मतदारसंघातील ( Amaravati Lok Sabha Constituency ) दुहेरी लढत 'प्रहार'च्या एन्ट्रीनं तिरंगी झाली. जात प्रमाणपत्राचे प्रकरण आणि कार्यकर्ते आणि नेत्यांचा विरोध असताना सुद्धा भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. तर, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेल्यानं त्यांनी बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली. महायुतीचे घटक असलेले आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध करत 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवार दिली होती.

त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं मते मिळवली. तर, दलित, मुस्लिम आणि कुणबी मतांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसनं धडपड केली. तसेच, 'प्रहार'मुळे झालेली मतविभागणी भाजप की काँग्रेस, कुणाच्या पथ्यावर पडते, हे 4 जूनला कळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण केल्याप्रकरणी झालेली नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना अटक झाली होती. त्यामुळे राणा देशभर प्रसिद्ध झाल्या. याचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न राणांनी निवडणुकीत केला. त्यासह जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राणांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दिला.

तसेच, भाजपमध्ये (BJP) प्रवेश आणि उमेदवारी मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यातून वातावरण निर्मिती करण्याचा नवनीत राणा यांचा प्रयत्न होता. मात्र, अमरावतीतील स्थानिक भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांचा छुपा विरोध हा राणांसाठी अडचणीचा ठरला. शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul ) आणि त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनीही नवनीत राणांना विरोध केला होता. पण, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अडसुळांनी अखेर आपली तलवार म्यान केली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला. येथून काँग्रेसनं दर्यापूरचे आमदार बळवंत बानखेडे ( Balwant Wankhede ) यांना उमेदवार दिली. ग्रामपंचायत चे आमदारकी असा बळवंत वानखेडे यांचा राजकीय प्रवास आहे. वानखेडे यांनी काँग्रेसच्या ( Congress ) परंपरेप्रमाणे प्रचार राबविला. काँग्रेस नेते, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी वानखेडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. तसेच, काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकूर ( yashomati Thakur ) यांच्यासह अन्य नेत्यांनी वानखेडे यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे मेहनतीचे फळ मिळणार का? याची उत्सुकता लागली आहे.

navneet rana balwant wankhede dinesh boob
Subodh Savji News : ...तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुडदा पाडेल; सुबोध सावजींच्या इशाऱ्यानं खळबळ

खोक्यांवरून आरोप केल्यामुळे बच्चू कडू आधीच राणा दाम्पत्यावर नाराज होते. महायुतीकडून अमरावतीची जागा मिळण्यासाठी 'प्रहार' आग्रही होती. त्यातच भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानं बच्चू कडू अधिकच आक्रमक झाले. बच्चू कडू यांनी शिवसेनेचे नेते, दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानात उतरवत निवडणूक तिरंगी केली. दिनेश बुब यांच्यासाठी बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी प्रचाराची खिंड लढवली होती. त्यामुळे 'प्रहार' भाजप की काँग्रेस कुणाचा खेळ बिघडविणार, याची चर्चा अमरावती मतदारसंघात रंगली आहे.

दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात ( Amravati Lok Sabha Constituency ) मुस्लिम, दलित आणि कुणबी मते अमरावतीत निर्णायक होती. त्या मतांची विभागणी कशा पध्दतीनं झाली, याचे आडाखे राजकीय विश्लेषकांकडून बांधण्यात येत आहेत.

अमरावती मतदारसंघात कुणाचे किती आमदार?

अमरावती जिह्यात एकूण 14 तालुके आणि सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा आणि मेळघाट या मतदारसंघांचा समावेश आहे. यात बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा, अमरावती विधानसभा मतदाससंघात काँग्रसेच्या सुलभा खोडके, तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत वानखेडे, मेळघाट मतदारसंघात 'प्रहार'चे राजकुमार पटेल, अचलपूर विधानसभा मतदारसंघात 'प्रहार'चे बच्चू कडू आमदार आहेत.

navneet rana balwant wankhede dinesh boob
Akola News: 'आंबेडकरांना मते देऊ नका,' असे मौलवींना सांगणारा काँग्रेस नेता अडचणीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com