Bhadrawati APMC Election 2025: उद्धव सेना अन् काँग्रेसला धक्का; भद्रावती बाजार समितीवर भाजपचा झेंडा

Bhadrawati APMC election BJP victory: केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार क्षेत्रातही आता भाजपने धडक्यात शिरकाव करणे सुरू केले आहे. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा भाजपने सोडली नाही.
BJP news
BJP newsSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रिकामी करण्याचा संकल्प भाजपने केला असल्याचे दिसून येते. यासाठी छोट्या छोट्या संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामोडींवरही बारकाईने लक्ष दिले जात आहे.

केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार क्षेत्रातही आता भाजपने धडक्यात शिरकाव करणे सुरू केले आहे. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा भाजपने सोडली नाही. बाजार समितीच्या उद्धव सेना आणि काँग्रेसच्या संचालकांना भाजपने आपल्याकडे खेचून भद्रावती बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली.

बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे हे निवडून आले आहेत. डोंगे हे आधी काँग्रेसचे होते. चेकबरागंज मनोरा ग्रामपंचायतीचे ते उपसरपंच आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीचे ज्ञानेश्वर डुकरे उभे होते. त्यांना पाच तर डोंगे यांना १३ मते पडली. यापूर्वी भाजपने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही आपला झेंडा फडकावला आहे.

BJP news
Dattatraya Bharane: कॅबिनेट सोडून भुजबळ का गेले? दत्ता भरणेंनी सांगितलं कारण..

बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या अविरोध निवडून आल्या.

BJP news
Manoj Jarange: जरांगेंच्या मागणीवरून कुणबी प्रमाणपत्र कसे काय देता? ओबीसी संघटना एकवटल्या; घेतला मोठा निर्णय

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनीसुद्धा निवडणूक बँकेची निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते. निवडणुकीची अर्जही दाखल केला होता. मात्र दोघांनीही निवडणुकीपूर्वीच माघार घेतली. या दरम्यान भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांनी विरोधकांच्या खेम्यात असलेल्या बँकेच्या संचालकांना फोडून भाजपात आणले.

BJP news
Thackeray Brothers Defeat: छोट्या निवडणुकीतून ठाकरेंना मोठा इशारा; भाजप-शिंदेंना दिलासा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शिंदे हे यापूर्वीसुद्धा चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले. सहकारी बँका, बाजार समित्या, सोसायट्या हे काँग्रेसचे बलस्थान होते. मात्र आता सर्व सहकार क्षेत्र भाजपने आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्हा बँकेवर भाजप महायुतीने वर्चस्व स्थापन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com