Dattatraya Bharane: कॅबिनेट सोडून भुजबळ का गेले? दत्ता भरणेंनी सांगितलं कारण..

Dattatraya Bharane ON Chhagan Bhujbal over Cabinet Meeting: मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआर मुळे छगन भुजबळ नाराज असून ते कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavis
Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआरला विरोध करून त्यात संदिग्धता असल्याचे म्हटले आहे.

  2. भुजबळ कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असली तरी दत्ता भरणे यांनी त्यांच्या कॅबिनेट बैठक सोडून जाण्याच्या वृत्ताला नकार दिला आहे.

  3. मराठा आरक्षण जीआरवर ओबीसी समाज नाराज असून आंदोलन सुरू झाले आहेत, तर जरांगेंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Pune News : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट बाबतच्या शासकीय जीआरला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या निर्णयात संदिग्धता आहे आणि सरकारला कोणतीही जात दुसऱ्या जातीत समाविष्ट करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी या जीआरविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने जो जीआर काढला आहे. त्याबाबत ओबीसी समाजामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जीआर जाळण्यात आणि फाडण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू झाली आहेत. याबाबत विचारलं असता भरणे म्हणाले, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळे कोणावरही सरकार अन्याय होऊ देणार नाही.

Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavis
Manoj Jarange: जरांगेंच्या मागणीवरून कुणबी प्रमाणपत्र कसे काय देता? ओबीसी संघटना एकवटल्या; घेतला मोठा निर्णय

सरकारने काढलेल्या जीआर बाबत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असून कॅबिनेटच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले जात आहे."काल झालेल्या कॅबिनेट मिटींगला मी स्वतः हजर होतो आणि माझ्यासोबत भुजबळसाहेब देखील त्या ठिकाणी हजर होते. त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला असावा असं मला वाटत नाही. ते अगोदर पंधरा मिनिटे आमच्या सोबत होते. त्यांना कोणतं तरी अचानक काम आले असावं. त्यामुळे ते निघून गेले असतील," असे भरणे म्हणाले.

Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavis
Thackeray Brothers Defeat: छोट्या निवडणुकीतून ठाकरेंना मोठा इशारा; भाजप-शिंदेंना दिलासा

मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआर मुळे छगन भुजबळ नाराज असून ते कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत बोलताना भरणे म्हणाले त्यांच्या नाराजी बाबत मला माहिती नाही आणि ते कोर्टात जाणार असतील तर ते त्यांनाच विचारणं अधिक योग्य ठरेल.

Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavis
Ichalkaranji NEWS: महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी इच्छुकांची धाकधूक वाढली; आज नशीब उजाडणार

सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआर वरून अनेक मराठा नेता नाराज असल्याचं बोलत आहे. त्याबाबत बोलताना भरणे म्हणाले, "जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेल्या जीआरचे स्वागत केले आहे. त्यामुळे इतर नेते काय म्हणतात याबाबत मला माहित नाही. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांचे नुकसान होणार आहे,"

FAQ

Q1: छगन भुजबळ यांनी कोणत्या निर्णयाला विरोध केला?
A1: हैदराबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णयाला (जीआर) विरोध केला.

Q2: भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला का?
A2: कृषीमंत्री भरणे यांच्या मते, ते थोड्या वेळासाठी उपस्थित होते आणि बहिष्कार टाकलेला नाही.

Q3: ओबीसी समाजाची जीआरविषयी भूमिका काय आहे?
A3: ओबीसी समाज नाराज असून अनेक ठिकाणी आंदोलन आणि जीआर जाळण्याच्या घटना झाल्या आहेत.

Q4: जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे?
A4: जरांगे पाटील यांनी सरकारच्या जीआरचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com