Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख बदला, 'वंचित'चं पुन्हा दबावतंत्र !

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं 'हे' कारण.
Sanjay Raut, Jayant Patil and Prakash Ambedkar
Sanjay Raut, Jayant Patil and Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi News : 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले आहे. मात्र, या बैठकीची तारीख बदलावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. 27 फेब्रुवारीला होणारी बैठक 28 फेब्रुवारी रोजी घेण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीमुळे 'वंचित'कडून पुन्हा दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाला असला तरी अद्यापही जागावाटपाचे ठरलं नसल्याने काल धैर्यवर्धन पुंडकर यांनी पक्षाची भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या चारपैकी दोनच बैठकांना आम्हाला बोलावलं असल्याचा दावा त्यांनी केला होता, तर वंचितला महाविकास आघाडी घटक पक्ष समजत नाही का, असा सवालही करण्यात आला आहे.

आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये सन्मानाने का बोलवत नाही. जागावाटपात वाटाघाटीमध्ये त्यांना स्थान का देत नाही, असे प्रश्नही महाविकास आघाडीला वंचितकडून विचारण्यात आले होते. आता 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण महाविकास आघाडीकडून 'वंचितला' देण्यात आले आहे. मात्र, या बैठकीची तारीख बदलण्याची मागणी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut, Jayant Patil and Prakash Ambedkar
Vanchit Vs BJP : 'मोदी सरकार' नाही 'भारत सरकार' लिहा; 'वंचित'ने उधळला कार्यक्रम

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार) महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला फोनवरून 27 फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मात्र, या बैठकीची तारीख बदलण्याची मागणी आपण त्यांना केली असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कारण याच दिवशी पुण्याला जाहीर सभा आहे आणि महाराष्ट्राची सर्व कमिटी त्यामध्ये गुंतलेली आहे. जयंत पाटील यांच्याकडून इतर सगळ्यांशी बोलून बैठक 27 ऐवजी 28ला होते का तपासतो, असं सांगण्यात आलं असल्याचे आंबेडकर म्हणाले.

आज सकाळी संजय राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 27 ला बैठक आहे, असं सांगण्यात आलं. संजय राऊत यांना सांगतो की, पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सायंकाळी जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची वंचितची सर्व टीम यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे 27 च्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही. हीच बैठक 28ला होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येण्याचे सांगितले आहे, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

काल या बैठकीचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ, असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आम्हाला निमंत्रण नसल्याचं पुंडकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. जेव्हा आज प्रकाश आंबेडकर यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं असताना आता वंचितकडून ही बैठक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित आणि महाविकास आघाडीचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगला आहे. वंचितकडून महाविकास आघाडीवर दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चाही यानिमित्ताने होऊ लागली आहे.

Edited By : Atul Mehere

R

Sanjay Raut, Jayant Patil and Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : नितेश राणे हा वेडा आमदार, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com