'मातोश्री'ला २ कोटी ; जाधवांच्या 'डायरी'वर फडणवीसांनी केली ही नोंद

आम्ही आधीच म्हणत होतो कोव्हिडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

नागपूर: शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav),त्यांचे सहकारी आणि बीएमसी (BMC)कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला (Incom tax department)काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. या डायरीत काही महत्त्वाचे व्यवहाराचे पुरावे सापडल्याची माहिती समोर आली आहे.

याच डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटींचं गिफ्ट दिल्याची नोंद असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आता याचबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadnavis
मी तिजोरीला चाव्या लावल्या तर काय मिळणार... अजित पवारांनी घेतली भरणेंची फिरकी!

''डायरीत नेमकी काय नोंद आहे, ती मी बघितलेली नाही. मात्र, आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल,''असे फडणवीस म्हणाले.

बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ''शंभर टक्के.. 24 महिन्यात 38 संपत्ती.. त्या देखील कोव्हिडच्या काळामध्ये? आम्ही आधीच म्हणत होतो कोव्हिडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही होत नव्हते. हे आता स्पष्ट झाले आहे.'' यासंदर्भात आयकर विभाग उचित चौकशी करेल. मला नाही वाटत की याबद्दल मी यापेक्षा जास्त प्रतिक्रिया दिली पाहिजे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

जाधव यांच्या डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis
Punjab Congress:सिद्धुंचे शक्तीप्रदर्शन, पुन्हा सक्रीय ; प्रदेशाध्यक्षपदासाठी २४ नेत्यांची बैठक

दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नावही 'मातोश्री' आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे. जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली होती. याच डायरीतील एक उल्लेख असा आहे की, ज्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP leader Arun Lakhani after being elected unopposed from the Chandrapur-Wardha-Gadchiroli Local Authorities Constituency, with discussions focusing on Banti Bhangdia’s political strategy.
BJP
Model Code of Conduct
Viplav Bajoria
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com