Bachchu Kadu : मी मंत्री बनणारच, तो माझा अधिकार ; नाराज आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bachchu Kadu : "आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही."
Bachchu Kadu Latest News in Marathi
Bachchu Kadu Latest News in Marathisarkarnama
Published on
Updated on

अमरावती: राज्यात सत्तातर झाल्यानंतर दोन महिन्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. यात संजय शिरसाट, बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे. आपल्या मनातील खंत काल (शुक्रवारी) बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी व्यक्त केली. (Bachchu Kadu latest news)

गेल्या काही दिवसापूर्वी मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नाराज होते, अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. यावर त्यांनी अमरावतीत बोलताना मंत्रिपदावरून महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Bachchu Kadu Latest News in Marathi
१५ मिनिटांतच कार्यक्रम आटोपता घेऊन शहांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रवाना, शिवसेनेची टीका

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्याबाहेरचा विषय आहे." असे बच्चू कडू म्हणाले. "आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही तो आमचा अधिकार आहे," असे बच्चू कडू म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे विदर्भावर लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. विदर्भात शिवसेना शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारांचा नियुक्तांचा धडाका लावला आहे. भंडारा येथे शिंदे शिवसेना गटातील अनिल गायधने यांची जिल्हाप्रमुख पदी वर्णी लागली आहे. दसरा मेळाव्यात भंडारातील शिंदे गटातील कार्यकर्ते जाणार आहेत. दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करणार आहे. या सर्व घडामोडींचा येत्या सर्व निवडणुकीत परिणाम दिसणार यात मात्र शंका नाही, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com