Bachchu Kadu Statement: मंत्रिपदाचा प्रश्न विचारताच बच्चू कडूंचा संताप; म्हणाले, 'आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का?'

Bachchu Kadu Angry: बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा नाराजीचा सूर...
Bacchu Kadu News
Bacchu Kadu NewsSarkarnama
Published on
Updated on

Political Marathi News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनंही मिळाली आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. असं असलं तरी गेल्या एक वर्षभरापासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मात्र, अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष नव्याने सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांमध्‍ये नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केलेली आहे. यातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांचा नाराजीचा सूर दिसून आला आहे.

Bacchu Kadu News
Minister Bungalow Allotment: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते नाही पण बंगले मिळाले; कोणत्या मंत्र्याचा मुक्काम कुठे असणार?

बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना त्यांना शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला. मात्र, हा प्रश्न विचारताच त्यांनी प्रतिप्रश्न करत आपला पुन्हा एकदा संताप व्यक्त केला.

बच्चू कडू म्हणाले, "कोणताही आमदार आस लावून बसला नाही. पण पत्रकारांना वाटतं आमदार आस लावून बसले आहेत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोत का? की मंत्रिपद काय भाजीपाला आहे काय? कुणी पिशवी घेऊन बसणार आहे का? ", असे प्रतिप्रश्न करत बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.

Bacchu Kadu News
Nana Patole News: काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडताच पटोलेंचं विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले...

दरम्यान, याआधीही बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला होता. "सहन करण्याची मर्यादा असते. ती मर्यादा संपली की कुणी कुणाचं नसतं, पण मी मंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला नव्हता", असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सूचक इशाराच दिला होता.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com