
Akola, 07 January : नुकसानीनंतरही पीकविम्याचा लाभ मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून येत असतात. पण शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. अनेक लोकप्रतिनिधींनीही पीकविम्याच्या मुद्यावर आवाज उठवला आहे. मात्र, पीकविमा कंपन्यांनी त्यांनाही न जुमानता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. पण अकोल्यातील मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरिश पिंपळे यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवडाभरातच शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पीकविमा अधिकाऱ्यांना सोडून दिले.
पीकविम्याच्या मुद्यावर भाजप आमदार हरिश पिंपळे (MLA Harish Pimple ) हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना विमा कंपन्याचे अधिकारी दाद लागू देत नव्हते. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. मुसळधार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तक्रारही संबंधित ॲपच्या माध्यमातून नोंदवली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप नुकसाना भरपाई मिळू शकलेली नाही.
मूर्तिजापूर मतदारसंघाच्या कुरुम मंडलातील शेतकऱ्यांनी सोयाबीनाचा विमा उतरला होता. मात्र, खरीप हंगाम २०२३-२०२४ या वर्षातील कुरुल मंडलातील ५४३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. वारंवार तक्रार करूनही पीकविमा (Crop Insurance ) कंपन्या दाद लागू देत नाहीत. तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पैसे उकळत असल्याचीही तक्रार शेतकऱ्यांनी आमदार पिंपळे यांच्याकडे केली होती.
आमदार पिंपळे यांनी सोमवारी विमा कंपन्यांचे अधिकारी आणि प्रतिनिधींसोबत मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. विमा कंपन्यांचे पाच अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकून संतापलेल्या आमदार पिंपळे यांनी त्या पाचही शेतकऱ्यांना शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीत डांबून ठेवले.
शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी किती यातना सहन कराव्या लागतात. किती मनस्ताप सोसावा लागतो, याची जाणीव पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी आमदारांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोलीत कोंडून ठेवले. आमदार पिंपळे यांनी पीक विमा अधिकाऱ्यांना तब्बल पाच तास एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शेवटी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी कुंभार यांनी येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल पाच तासानंतर पिंपळे यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सुटका केली. विशेष म्हणजे आमदार हरीश पिंपळेही त्याच खोलीत बसून होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.