Samruddhi Mahamarg : शिंदे गटाच्या आमदाराची टोल कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् धमकी; 'हे' आहे कारण

MLA Sanjay Raimulkar : मुलची गाडी फ्री सोडल्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यावर कारवाई
Sanjay Raimulkar
Sanjay RaimulkarSarkarnama
Published on
Updated on

Vidarbh Samruddhi Highway : राज्यातील सत्ताधारी शिंवसेनेचे आमदार संजय रायमूलकर यांनी समृध्दी महामार्गावरली टोल नाक्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत धमकी दिली. त्याला मारहाणीची भाषा केली. टोल कर्मचारी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्यावर त्यांनी तेथून आलेल्या सर्वांना उचलून मेहकरला घेऊन जाईल, अशी भाषा केली. दरम्यान कर्मचारी बोलण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र त्याचे म्हणणे मांडू दिले नाही. आमदार रायमूलकरांनी कर्मचाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sanjay Raimulkar
Sambhaji Nagar Dangal : छ. संभाजीनगर दंगलीची पूर्वकल्पना होती? ; 'एसआयडी'च्या अहवालात धक्कादायक खुलासे!

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Mehkar) विधानसभा मतदारसंघाचे संजय रायमूलकर (Sanjay Raimulkar)आमदार आहेत. त्यांनी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) असलेल्या टोलनाक्यावरील व्यवस्थापकास शिवीगाळ केली आहे. त्या कर्मचाऱ्यास धमकीही दिली. तसेच टोलनाका बंद पाडण्याची धमकीही दिली.

दोन दिवसांपूर्वी रायमूलकरांच्या मुलाची गाडी फ्री सोडण्यात आली होती. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याने मुलाची गाडी फ्री सोडली त्याला दंड ठोठाविला आहे. दरम्यान, गाडी फ्री सोडण्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आले आहे. यामुळे आलल्या रागातून टोल कर्मचाऱ्याला मी अर्वाच्च भाषा वापरल्याचा अजब खुलासाही आमदार रायमूलकर यांनी केला आहे.

Sanjay Raimulkar
Political News : राज्याच्या राजकारणात चाललंय काय? उदय सामंत अन् भरत गोगावले पवारांच्या भेटीला!

टोल कर्मचाऱ्यास रायमूलकारांनी कार्यालयात बोलावून घेतले. तेथेच त्याला शिवीगाळ आणि धमकी दिली. रायमूलकर म्हणाले, "काय रे तू मॅनेजर आहेस का. येथे येऊन दादागिरी करतोस का? काय झालं त्या टोलनाक्यावर? जास्त बोललास तर लय मार देईल. त्या मुलाला बाहेर का काढलं..? येथे येऊन एवढी दादागिरी करायला लागलास तर खूप मार खाशील. सर्व टोलनाकाच फ्री करून टाकील. उत्तर प्रदेशातून येथे यायाचं नाही. नाहीतर सर्वांना उचलून मेहकरला घेऊन जाईल."

Sanjay Raimulkar
Manish Sisodia Case Update : मनीष सिसोदियांना न्यायालयाचा दणका; नेमकं काय झालं...?

यावेळी आमदार रायमूलकारांनी कर्मचाऱ्याला शिव्यांच्या लखोल्याही वाहिल्या. टोल बंद पाडण्याची भाषाही केली. उत्तर प्रदेशातून आलेल्या सर्वांना उचलण्याची धमकीही दिली. यावेळी कर्मचारी शांतपणे ऐकून घेत होता. काही बोलायला लागला तर रायमूलकर त्याचे ऐकून घेत नव्हते. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान आमदारांच्या कुटुंबीयांना टोलमाफी नाही. त्यामुळे आता रायमूलकरांवर कारवाई होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com