Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 News : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा पेन ड्राईव्ह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आणला. त्यानंतर सोमय्यांच्या विरोधात राज्यभर वातावरण तापले आहे. (The atmosphere is heated all over the state against Somaiya)
उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे, अनिल परब, कॉंग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अनिल परबांनी तर सभागृहात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हानच दिले.
ज्या पद्धतीने मराठी लोकांविषयी पेन ड्राईव्हमध्ये बोलल्याचे दिसत आहे. तो पेन ड्राईव्ह विरोधी पक्षनेत्यांनी सभापतींकडे सोपवला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश देणार का, असा सवाल परब यांनी केला. त्यावर फडणवीसांनी कारवाई करण्याबाबत सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो विषय अंबादास दानवे आणि परब यांनी मांडला, तो गंभीर आहे. त्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात, की आयुष्य पणाला लागते. यासंदर्भात आपल्याकडे तक्रारी असतील, तर त्याही आमच्याकडे द्या, या संपूर्ण प्रकरणाचे सखोल चौकशी केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
महिलेची ओळख काढण्यासाठी पोलिसांना (Police) सांगितले जाईल. कायद्याच्या चौकटीत राहून ते त्या महिलेला हुडकून काढतील. कुणीही काळजी करू नका. प्रकरण दाबणे, दडपणे, कुणाला पाठीशी घालणे, असे प्रकार अजिबात होणार नाहीत. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तसे आदेश तात्काळ दिले जातील, असे फडणवीस म्हणाले.
काही वृत्तवाहिन्यांवरून त्या व्हिडिओतील शॉट्स दाखवले जात आहेत. जरी ते ब्लर करून दाखवले जातात, तरी ते कृत्य काय चालले आहे, हे लक्षात येतेच. त्यावर बंधन असले पाहिजे. वाहिन्यांनी तशी माहिती द्यावी कारण ती माहिती पीडित महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे. पण व्हिडिओ दाखवताना काळजी घेतली पाहिजे, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
शेवटी काय तर त्या महिलेची तक्रार आली पाहिजे. अनेक वेळा महिलांनी ऐकून सभागृहातील चर्चा ऐकून तक्रारी दिलेल्या आहेत. यापूर्वी आर. आर. पाटील, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माझ्याशीही काही पीडितांनी थेट संपर्क केला आहे. सभागृहावर लोकांचा विषय आहे. त्यामुळे याही प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असे नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.