Mumbai Blast Verdict: उच्च न्यायालयाचा बॉम्बस्फोटप्रकरणी धक्कादायक निकाल; 2 आरोपी 19 वर्षानंतर कारागृहातून बाहेर, पण...

Nagpur Jail News: लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करून मुंबईला हादरवणाऱ्या सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
Nagpur jail  (1).jpg
Nagpur jail (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करून मुंबईला हादरवणाऱ्या सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) निर्दोष सुटका केली आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. यापैकी कोरोनाच्या काळात एकाचे निधन झाले तर एकावर आणखी एक गुन्हा दाखल असल्याने त्याची सुटका करण्यात आली नाही.

दोन आरोपींना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कारागृहातून मोकळे करण्यात आले. मात्र त्यांना घ्यायला एकही नातेवाईक आला नाही. सुमारे दोन दशकांपासून कारागृहात असल्याने त्यांचीही मानसिक स्थिती बाहेर जाण्याची नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ते कुठे जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ते कुठे जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Local Train Blast) प्रकरणी तब्बल 19 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल सुनावला आहे.

सोमवारी सुनावलेल्या या निकालात उच्च न्यायालयाने सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या स्फोटांच्या मालिकेत 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.

Nagpur jail  (1).jpg
Ravikiran Ingawale: 'मातोश्री'हून मिळालं बळ; नव्या दमाचे इंगवले आतातरी ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला शाप पुसणार?

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपी 2015 पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात होते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींमध्ये एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी व नावेद हुसैन खान रशिद हुसैन खान हे दोघे फाशीचे तर शेख मोहम्मद अली अलम शेख हा जन्मठेपेचा कैदी आहे.

चौथा कमाल अन्सारी कोरोनात मरण पावला होता. तीनपैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी व शेख मोहम्मद अली अलम शेख या दोघांची सुटका करण्यात आली. नावेद हुसैन खान रशिद हुसैन खान याच्यावर इतर गुन्हे असल्याने त्याची सुटका करण्यात आली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Nagpur jail  (1).jpg
Jagdeep Dankhar Resigns: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा अचानक राजीनामा! वैद्यकीय कारणास्तव पद सोडत असल्याची घोषणा

बॉम्बस्फोट आणि देशद्रोहाचा गंभीर गुन्हा असल्याने आरोपींना घ्यायला कोणीच पुढे आले नसल्याचे समजते. त्यांना कोणी स्वीकारायला तयार नसल्याने त्यांच्यासमोर जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com