Nagpur Bazargaon blast : एकाच बारूद कंपनीत वारंवार स्फोट, कसे काय होतात? अनिल देशमुखांनी व्यक्त केली शंका

Nagpur Bazargaon Gunpowder Company Blast Anil Deshmukh Reacts NCP News : नागपूर जवळील बाजारगाव इथल्या बारूद कंपनीत स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकूण 17 कामगार जखमी झाले आहेत.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur news : नागपूर जवळ असलेल्या बाजारगाव इथल्या बारूद कंपनीत स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकूण 17 कामगार जखमी झाले आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात याच कंपनी स्फोट होवून 10 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर धामणा परिसरातील चामुंडा कंपनीत स्फोट झाल्याने इथल्या 9 कामगारांचा मृत्यू झाला होता.

बारूद कंपनीमध्ये वारंवार स्फोट कसे काय होतात, असा सवाल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या घटनांपासून राज्य सरकारने बोध घ्यावा, कडक नियमावली तयार करावी संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.

बुधवारी मध्यरात्री सोलार कंपनीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला. स्फोटाच्‍या जबरदस्त हदऱ्याने कंपनीच्या इमारतीला तडे गेलेत. इमारतीचा तुटलेल्या भिंतीचा मलबा रस्तावर येऊन पडला आहे. यावरून हा स्फोट भीषणता दिसून येते. घटनेची माहिती मिळताच अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे घटनास्थळी रवाना दाखल झाले. त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जखमी कामगारांना नागपूर (Nagpur) इथल्या रुग्णालयात पोचवण्याची व्यवस्था केली.पहाटेपर्यंत रुग्णांना नागपूर इथं हलवण्यात येत होते. देशमुख यांनी पोलिस अधिकारी तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घटना नेमकी कशी घडली याची माहिती जाणून घेतली.

Anil Deshmukh
Ahilyanagar Ward Structure : प्रभाग रचनेतच, काँग्रेस-ठाकरे-पवार पक्षाच्या 'धज्जियाँ' उडवल्या; महापौर पदाबरोबर प्रभागाचं आरक्षण प्रलंबित

मृतकाच्या कुटुंबियांना कंपनीने भरीव मदत करून सर्व जखमीवर कंपनीच्या खर्चातून उपचार करण्याच्या सूचना अनिल देशमुख यांनी कंपनी प्रशासनाला केली. बाजारगाव परिसरात असलेल्या बारूद कंपन्यांमध्ये स्फोटाच्या घटना वारंवार घडत आहे. यात कामगारांचा नाहक बळी जात आहे.

Anil Deshmukh
Manoj Jarange: जरांगेंच्या मागणीवरून कुणबी प्रमाणपत्र कसे काय देता? ओबीसी संघटना एकवटल्या; घेतला मोठा निर्णय

मागील वर्षी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना एका कंपनीत स्फोट झाला होता. यात नऊ कामगारांचा बळी गेला होता. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा स्फोट झाला आहे. हे बघता कंपन्या किती बेफिकीर आहेत हे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com