FDA drug alert : सरकारी रुग्णालयांतील दोन औषधे निकृष्ट; 1.25 लाख गोळ्या परत

FDA flags quality defects in paracetamol and telmisartan supplied to Nagpur government hospitals : FDAच्या गुणवत्ता चाचणीत पॅरासिटामॉल-500 आणि टेल्मीसार्टन-40 एमजीच्या बॅचमध्ये दोष; नागपूर मेडिकल आणि मेयोतील साठा हटवण्याचे निर्देश.
FDA drug alert
FDA drug alertSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra FDA : शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरवण्यात येणारी पॅरासिटामॉल-500 एमजी आणि टेल्मीसार्टन-40 एमजी ही दोन औषधे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुणवत्ता चाचणीत निकृष्ट दर्जाची आढळली आहेत.

नियमित तपासणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत ही बाब समोर आली. त्यानंतर संबंधित शासकीय रुग्णालयांना औषधांचा साठा तातडीने वितरणातून हटवून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले.

ही दोन्ही औषधे नागपुरातील (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे पुरवण्यात आली होती. दोन्ही औषधांची निर्मिती इंदूर येथील एका कंपनीने केली आहे. FDAच्या तपासणीत ‘पॅरासेव्ह-500’ या नावाच्या पॅरासिटामॉल-500 एमजी गोळ्यांच्या PTTC-108 या बॅचमध्ये गुणवत्ता निकषांची पूर्तता न झाल्याचे आढळले. या गोळ्या जुलै महिन्यात शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात आल्या होत्या.

FDAच्या निर्देशानंतर संबंधित साठा परत मागवण्यात आला. त्यानुसार सुमारे 1.25 लाख पॅरासिटामॉल गोळ्या वितरणातून हटवण्यात आल्या. यापैकी सुमारे 25 हजार गोळ्या शासकीय रुग्णालयाच्या साठ्यात शिल्लक होत्या.

FDA drug alert
Sugar Stock Limit : साखर साठवणुकीची मर्यादा दुप्पट; आता 30 दिवसांचा साठा करता येणार, पण ‘ही’ अट कायम

उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मीसार्टन-40 एमजी औषधाच्या CHPLT 416 या बॅचमध्येही गुणवत्ता दोष आढळला. या औषधाच्या नमुन्यांमध्ये विरघळण्याच्या (Dissolution) चाचणीत त्रुटी आढळली. तसेच गोळ्यांवर डाग असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. औषध शरीरात योग्य प्रकारे काम करण्यासाठी त्यातील सक्रिय घटक निर्धारित पद्धतीने विरघळणे आवश्यक असते. त्यामुळे या बॅचचा साठा वॉर्ड तसेच फार्मसीमधून परत मागवण्यात आला आहे.

FDA drug alert
Ahilyanagar DCC Bank Election : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ढाकणेंचे शिलेदाराचा मार्ग मोकळा, भाजप आमदार राजळे समर्थकांना धक्का?

निकृष्ट औषध म्हणजे बनावट औषध नव्हे

FDAच्या कारवाईत संबंधित औषधांना ‘निकृष्ट दर्जाची’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, याचा अर्थ ही औषधे बनावट असल्याचा नाही. निकृष्ट दर्जाच्या औषधामध्ये औषधाची शुद्धता, ताकद, स्थिरता किंवा विरघळण्याची क्षमता यांसारख्या गुणवत्ता निकषांमध्ये त्रुटी आढळू शकते. त्याउलट बनावट औषधामध्ये चुकीचे, अपुरे किंवा अपेक्षित सक्रिय घटक नसण्याची शक्यता असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com