Vidhanparishad Election : विधानपरिषदेसाठी शरद पवारांचा 'मास्टरप्लॅन' रेडी! 'सिल्व्हर ओक'वर संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब? महायुतीची कोंडी होणार

NCP Sharad Pawar Party News : 2020 साली सहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत या पाच पैकी चार जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषदेच्या पाच जागासाठी सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 2020 साली सहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत या पाच पैकी चार जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यामध्ये दोन जागा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी नेतेमंडळींच्या उपस्थित रणनीती ठरविण्यात आली. 'सिल्व्हर ओक'वर झालेल्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याचे समजते.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागेवर विजय मिळवता आला होता. या दोन जागांवर पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. त्यासोबतच पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर, संभाव्य उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार यांच्या पक्षासोबत गेले तर पुणे पदवीधर मतदारसंघात विजय मिळवणारे अरुण लाड शरद पवार यांच्या पक्षसोबत आहेत. मात्र, आगामी काळात होत असलेली निवडणूक ते लढणार नाहीत. त्यांनी त्यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश कला असून ते भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

विधानपरिषद निवडणुकीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Sharad Pawar
MLC Election : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मित्रपक्षांची एकमेकांविरोधातच 'फिल्डिंग'; महायुती अन् मविआच्या गोटात प्रचंड अस्वस्थता; कोण मारणार बाजी?

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर, संभाव्य उमेदवारांच्या निवडीवर आणि या निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी कशी सुधारता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका विधान परिषदेतील पक्षाच्या ताकदीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

Sharad Pawar
MLC Election : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मित्रपक्षांची एकमेकांविरोधातच 'फिल्डिंग'; महायुती अन् मविआच्या गोटात प्रचंड अस्वस्थता; कोण मारणार बाजी?

या बैठकीद्वारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) या निवडणुकांना गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीने या निवडणुकांमध्ये यश मिळवून विधान परिषदेतील स्थान मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे, सिल्व्हर ओक येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com