Nagpur HSC Paper Leak : पेपरफुटीचे रॅकेट उघड, शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; पोलिसांच्या कारवाईत अनेक तथ्थ येणार समोर...

Maharashtra Board Paper Leak News : नागपूरमध्ये बारावी केमेस्ट्री आणि फिजिक्स पेपरफुटी प्रकरणात शिकवणी संचालक आणि विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याने बोर्डाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Police escorting accused tuition director in Nagpur after HSC Chemistry and Physics paper leak case investigation.
Police escorting accused tuition director in Nagpur after HSC Chemistry and Physics paper leak case investigation.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात बुधवारी (ता.18) बारावीचा ‘केमेस्ट्री’ आणि फिजिक्स विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फोडणाऱ्या शिकवणीच्या संचालकासह विद्यार्थ्याला सदर पोलिसांनी अटक केली.

निशिकांत मूल (वय 40, रा. मानकापूर), फरहान फहीम (वय 18, रा. कपिलनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निशिकांत मूल याची मानकापूर परिसरात ‘मूल ॲकेडमी’ या नावाने शिकवणी वर्ग आहे. त्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह जेईईची शिकवणी घेण्यात येते. त्यात बारा ते पंधरा विद्यार्थी शिकतात. चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की ज्या व्हाट्सॲप ग्रुपद्वारे प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या गेल्या होत्या तो त्यानेच तयार केला होता. ग्रुप चालवण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर देखील त्याच्या नावाने नोंदणीकृत होता. दुसरा आरोपी फरहान फहीम हा एक विद्यार्थी आहे. तो व्हॉट्सॲप ग्रुपचा सदस्य आहे.

विद्यार्थिनीची चौकशी आणि तांत्रिक तपास केल्यावर तो पेपर निशिकांत याच्या शिकवणी वर्गातून फोडण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून पोलिसांनी रविवारी (ता.22) पहाटेच्या सुमारास सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या साथीदार असलेल्या फरहान अख्तर या विद्यार्थ्यालाही पोलिसांनी अटक केली. विद्यार्थ्याने या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्‍नपत्रिका पोस्ट केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना विशेष न्यायालयासमोर सादर करीत, 26 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळविली.

Police escorting accused tuition director in Nagpur after HSC Chemistry and Physics paper leak case investigation.
Chandrapur Mahapalika News: काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या निष्ठेवर पाणी! 'स्वीकृत' बाबत प्रदेश काँग्रेस कमेटीचा मोठा निर्णय

अशी उघडकीस आली होती घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.18) शहरातील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या केंद्रावर बारावीचा केमेस्ट्रीचा पेपर सकाळी 10.37 वाजता परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या सुमारे 23 मिनिटे आधी 9579874939 या मोबाईल क्रमांकावरून शेअर करण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांच्यासह विस्तार अधिकारी रमेश हरडे आणि उपशिक्षणाधिकारी किरण चिंकुरे यांनी तपास करून अहवाल तयार केला. याविरोधात सदर पोलिसांना दिला. पोलिसांनी अहवालाच्या आधारे दोन आरोपीविंरुद्ध गुन्हा दाखल केला.

Police escorting accused tuition director in Nagpur after HSC Chemistry and Physics paper leak case investigation.
Nagpur Job Fraud : केंद्रीय मंत्र्याच्या PA सोबत ओळख असल्याची बतावणी; उकळले लाखो रुपये : विदर्भातील बंटी-बबलीला नागपूर पोलिसांच्या बेड्या

संशयाची सुई बोर्डाकडे ?

बारावीचा फिजिक्स आणि केमेस्‍ट्रीचा पेपर फुटल्याने राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात शिकवणी वर्गाच्या संचालकाला अटक केली. मात्र, पेपर फुटू नये याची संपूर्ण काळजी बोर्डाकडून घेण्यात येते. त्यानंतरही बोर्डाचे दोन महत्‍वाच्या विषयाचे पेपर शिकवणी वर्गाच्या हाती कसे काय आले ? हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे संशयाची सुई आता बोर्डाकडे वळली आहे. तो संबंध शोधण्यासाठी पोलिसांकडून कॉल डिटेल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप डेटासह तांत्रिक विश्‍लेषण करीत तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com