Nagpur DJ News: नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचा कौतुकास्पद निर्णय; 'ईद'पासून ते 'संदल'पर्यंत सर्व कार्यक्रमांमध्ये 'डीजे'वर बंदी

DJ Controversy : पुण्यात आगामी गणेशोत्सवातील डीजे बंदीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर या वादाला नवे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे डीजे चालक, मालक आणि काही गणेश मंडळांनी या बंदीला तीव्र विरोध दर्शवला आहे.
DJ Nagpur Muslim Commnuity  .jpg
DJ Nagpur Muslim Commnuity .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: पुण्यात आगामी गणेशोत्सवातील डीजे बंदीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर या वादाला नवे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे डीजे चालक, मालक आणि काही गणेश मंडळांनी या बंदीला तीव्र विरोध दर्शवला असून, यामुळे रोजगारावर गदा येत असल्याचा आरोप केला आहे. बापटांवर थेट हल्लाही झाला. याचदरम्यान, नागपूरमध्ये डीजेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर मुस्लिम समाजानेही एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

नागपूरमधील 'मुहतमिम अल जामेअतुर रझविया दारुल उलूम अमजदिया' या संस्थेनं सोमवारी (ता.7सप्टेंबर) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुस्लिम धार्मिक संस्थेने धार्मिक सण, संदल, मिरवणुका आणि लग्नसमारंभात डीजे वापरण्याविरोधात फतवा काढला आहे. या निर्णयामागं कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखणं हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही नागपूरमधील 'मुहतमिम अल जामेअतुर रझविया दारुल उलूम अमजदिया' या संस्थेच्या घेतलेल्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. "आस्था के साथ लोगों की शांति और स्वास्थ्य का भी ध्यान रखना जरूरी है।" कायदा आणि नियम सर्वांसाठी समान असल्यानं दर्गा आणि सर्व मिरवणुकांमध्ये डीजे आणू नये, असं आवाहन त्यांनी मुस्लिम बांधवांना केलं आहे.

'मुहतमिम अल जामेअतुर रझविया दारुल उलूम अमजदिया' या संस्थेनं सार्वजनिक ठिकाणी डीजेच्या माध्यमातून कर्णकर्कश आवाज निर्माण करणं हे नागरिकांच्या अडचणीचे ठरू शकते. ही बाब लक्षात घेत धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली इतरांना त्रास होईल,अशी कृती करणे टाळले पाहिजे. तसेच डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो, त्यामुळे असं कृत्य इस्लामच्या नियमांच्या विरुद्ध असल्याचं फतव्यात म्हटलं आहे.

DJ Nagpur Muslim Commnuity  .jpg
Abdul Sattar News: शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी तब्बल सात वर्षांनी पुन्हा गाठलं 'काँग्रेस' भवन; जुन्या मित्राची घेतली भेट, नवे राजकीय संकेत?

नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यांनी शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि लेझर लाईट्समुळे डोळ्यांना होणारा त्रास लक्षात घेता 1 नोव्हेंबर 2026 च्या मध्यरात्री 11.59 वाजेपर्यंत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणांवर (साऊंड सिस्टिम) आणि लेझर बीम लाईट्सच्या वापरावर बंदी घातली आहे.

नागपूर पोलिसांनी डीजेवर पूर्ण बंदी नसून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मल्टीलेअर साऊंड सिस्टिमवर ही बंदीची कारवाई केली जाणार आहे. जे साऊंड सिस्टिम चालक 'ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000' अंतर्गत ठरवून दिलेल्या मर्यादित डेसिबलच्या नियमांचे पालन करणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. याचवेळी नागपूर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची यंत्रणा सील करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

DJ Nagpur Muslim Commnuity  .jpg
Fadnavis Government: विद्यार्थ्यांच्या दणक्यानंतर फडणवीस सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर : फक्त 20 दिवसांत काढले 12 शासन निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com