Nagpur News: सरकारनं बिल थकवल्यानं आणखी एका कंत्राटदारानं संपवलं जीवन! महायुती सरकारसमोरच्या अडचणी वाढणार

Nagpur News: काही दिवसांपूर्वीच एका तरुण कंत्राटदारानं सरकारनं त्याचं बिल थकवल्यामुळं स्वतःचं जीवन संपवलं होतं.
 crime News
crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: कंत्राटदारांच्या थकबाकीचा मुद्दा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. एका युवा कंत्राटदाराने यापूर्वी आत्महत्या केली होती. आता नागपूरमधील एका हॉट-मिक्स कंत्राटदाराने सरकारनं थकवलेल्या बिलामुळं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांच्या अंतरानं ही दुसरी घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

 crime News
Chhagan Bhujbal: ब्राह्मण, मारवाडी पण शेतकरी मग त्यांचं काय करायच? भुजबळांचा जरांगेंना सवाल; हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच दाखवल्या वाचून

मुन्ना वर्मा असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. राज्य सरकारकडून थकलेले देयके मिळत नसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केला होता. यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील एका शासकीय कंत्राटदाराने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपमुख्यमंत्री व राज्याचे वित्तमंत्री अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कंत्राटदाराच्या आत्महत्येची दखल घेतली होती.

 crime News
Manoj Jarange: सगळ्यांनी मैदानात या, रोडवर फिरु नका; ज्यांना ऐकायचं नाही...; हायकोर्टाच्या नाराजीनंतर जरांगेंचं भावनिक आवाहन

यापुढे कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. आम्ही कंत्राटदारांची थकबाकी देण्यासाठी आठ हजार कोटींची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी आता निश्चिंत राहावे, आत्महत्येचे विचार डोक्यातून काढून टाकावे, एकाही कंत्राटादारेच बिल पेंडिंग राहणार नाही असा दावा त्यांनी केला होता. चार दिवसानंतर नागपूरमध्ये क कंत्राटदारांच्या असोसिएशनच्यावतीने थकबाकीसाठी भीक मांगो आंदोलन केले होते. तत्पूर्वी यापूर्वी थकबाकीसाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी आंदोलन केले होते. प्रत्येक वेळ आश्वासने देऊन सरकार वेळ मारून नेत असल्याचा आरोप कंत्राटदारांना आहे.

 crime News
Maratha Andolan: "जे आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक समजले जातील, अन्यत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई; सरकारचे स्पष्ट संकेत

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कोट्यवधीचे विकास कामे महायुती सरकारने जाहीर केले. कार्यादेश काढून कामांचे वाटप केले. सरकारकडून आज ना उद्या देयके मिळतील या आशेने कंत्राटदारांनी कामे केली. मात्र आता सरकारकडे पैसेच नाही असे सांगून हात वर केले जात असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे. लाडकी बहिणीला पैसे देण्यासाठी विकास कामांचा पैसा वळता केला जात आहे. त्यामुळे कंत्राटदारांना वेठीस धरण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. कंत्राटदार मुन्ना वर्मा नागपूरच्या राजनगर परिसरातील रहिवासी आहे. सदर पोलिस ठाण्यात त्यांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com