Devendra Fadnavis: लाडक्या बहिणींची रांगोळी, घरांवर विशेष रोषणाई ; धरमपेठ परिसरात आज साजरी होणार 'देव दिवाळी' VIDEO पाहा

CM Devendra Fadnavis Nagpur Visit First Time After cm of Maharashtra: देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे.
cm devendra fadnavis
cm devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिल्यांदा आपल्या घरी नागपुरात येत आहेत. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. नागपुरातील धरमपेठ परिसरात फडणवीसांचे निवासस्थान आहे. त्रिकोणी पार्क परिसरात ते राहतात. ते आज येणार म्हणून या परिसरातील प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी जोरदार तयारी केली आहे.

cm devendra fadnavis
Maharashtra cabinet expansion Live Update : हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडणार - CM फडणवीस

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात येत आहेत. त्रिकोणी पार्क परिसरामध्ये स्वतःच्या निवासस्थानी त्यांचे आगमन होईल. देवेंद्र फडणवीसांचे आगमन आमच्यासाठी देव दिवाळी असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. फडणवीसांच्या आगमनाच्या वेळी संपूर्ण परिसरामध्ये रांगोळ्या टाकून, प्रत्येक घरी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांनी ठरववलं आहे.

cm devendra fadnavis
Nanded Crime News : पुणे, बीड,परळीनंतर आता नांदेड..! ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखाचं अपहरण,पण...

या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळे स्वागताचे उपक्रम राबविले जात आहे. मुख्यमंत्री सचिवालयामध्ये एक भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही रांगोळी साकारण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो सुद्धा हुबेहूब रांगोळीत साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याच्या सचिवालयात अशा प्रकारे या महत्त्वाकांक्षी योजनेची रांगोळी काढून स्वागताची तयारी केली गेली आहे.

उद्यापासून 16 डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. आज संध्याकाळी ४ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासोबतच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप २१, शिवसेना १३ तर राष्ट्रवादी ०९ मंत्री शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे. नाव फायनल झालेल्या नेत्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून फोन जात आहे.

अशी आहे फडणवीसांच्या रॅलीचा मार्ग

  • देवेंद्र फडणवीस यांचं दुपारी १२ वाजता नागपूरमध्ये आगमन होणार आहे.

  • विविध चौकात त्यांचं स्वागत समर्थक स्वागत करतील.

  • त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करतील.

  • हेडगेवार स्मारक स्थळी वंदन करून रॅलीला सुरवात होईल.

  • शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी नगर बजाज नगर शंकर नगर चौक होत लक्ष्मीभवन चौकात पोहचतील.

  • याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेला संबोधित करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com