HSC Paper Leak Case: बारावीचा पेपरफुटी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे? विद्यार्थीनी प्रसाधनगृहात गेली अन्...

Nagpur Paper Leak Case: बारावीच्या परीक्षेचे आत्तापर्यंत झालेले तीन पेपर परीक्षेच्या वेळेआधीच फुटल्यानं समोर आलं आहे.
HSC Paper Leak
HSC Paper Leak
Published on
Updated on

Nagpur Paper Leak Case: राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत, या परीक्षेतील तीन पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खुलासा देखील ज्या पद्धतीनं झाला आहे ते ऐकल्यावर तर तुम्हाला धक्काच बसेल. पेपर सुरु झाल्यानंतर एक विद्यार्थीनी प्रसाधनगृहात गेली आणि त्यानंतर शिक्षकांना या पेपरफुटीचा खुलासा झाला. या प्रकरणात नेमकं काय काय घडलं? जाणून घेऊयात.

HSC Paper Leak
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांकडून राज ठाकरेंचा संदर्भ देत संजय राऊतांना खोचक टोला; म्हणाले, कुठे जायचं...

पेपरफुटल्याचं कसं आलं लक्षात?

नागपूरमधील एका परीक्षा केंद्रावर ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर तासभर पेपरची वेळ पुढे गेल्यावर एक विद्यार्थीनी पेपर सुरु असताना मध्येच उठून प्रसाधनगृहात गेली. त्यानंतर १५ मिनिटांनंतर ती पुन्हा पेपर सुरु असलेल्या आपल्या वर्गात परतली. बराच उशीर झाल्याचं लक्षात आल्यानंतर उशीर का झाला म्हणून एका महिला शिक्षिकेनं या विद्यार्थीची तपासणी केली. त्यावेळी या मुलीजवळ एक मोबाईल आढळून आला.

HSC Paper Leak
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांकडून राज ठाकरेंचा संदर्भ देत संजय राऊतांना खोचक टोला; म्हणाले, कुठे जायचं...

व्हॉट्सअॅप ग्रुप

दरम्यान, हा मोबाईल तपासल्यानंतर त्यात XII नावाचा एक वॉट्सअॅप ग्रुप आढळून आला. या ग्रुपमधील मेसेज तपासल्यानंतर तर सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण यापूर्वी १६ तारखेला झालेला फिजिक्सचा पेपर आणि १८ तारखेला झालेला केमिस्ट्रीचा पेपर पेपर सुरु व्हायच्या वेळेआधीच या ग्रुपवर पाठवण्यात आला होता. हे दोन्ही पेपर साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ग्रुपवर आले होते. प्रत्यक्षात पेपरची ११ वाजताची वेळ आहे. या ग्रुपमध्ये केमिस्ट्रीच्या पेपरची कॉपीही आढळून आली. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये २१ सदस्य आहेत. या सदस्यांमध्ये पेपर शेअर करणारा आणि उत्तरं पुरवणारा प्रमुख आरोपी आणि या बेकायदा गोष्टीचा लाभ घेणारे विद्यार्थी असे दोघांचाही समावेश आहे.

HSC Paper Leak
Dharashiv Politics : निष्ठावंत ओम राजेनिंबाळकरांच्या जिल्ह्यातच उद्धव ठाकरेंना धक्का? भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयाचे हादरे थेट 'पक्षफुटीपर्यंत'

अनेक प्रश्न झाले उपस्थित

पण आता या पेपरफुटीच्या हायटेक प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानुसार, पेपर अधिकृत वेळेपूर्वी कसा लीक झाला? साडेदहा वाजता पेपर बंद लिफाफात शिक्षकांच्या हाती वर्गामध्ये पोहोचतो त्यानंतरच हा फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळं हे पेपर फोडणारा शिक्षक नेमका कोण? व्हॉट्सअॅपवर आलेल्या उत्तरांचा विद्यार्थांना प्रत्यक्ष फायदा झाला का? कॉपीसाठी प्रोत्साहन देणारा अॅडमिन कोण? पेपर फोडण्यात खाजगी ट्युशन क्लासेसचा संबंध आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

HSC Paper Leak
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांकडून राज ठाकरेंचा संदर्भ देत संजय राऊतांना खोचक टोला; म्हणाले, कुठे जायचं...

बोर्डाच्या अध्यक्षांचं अजब विधान

पण नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटले यांनी अजब विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, काही ठराविक लोकांच्या हाती पेपर पोहोचला याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची पडताळणी सुरू असून अज्ञात व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन आणि दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सायबर तपास आणि डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणही सुरू करण्यात आलं आहे. पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून विद्यार्थी हे अल्पवयीन मुलं असल्यानं संवेदनशीलेचा मुद्दा म्हणून पोलिसांनी कुणाचीही नावं उघड करणं टाळलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com