Nagpur MLC Election: ‘भाजप यंत्रणेचा कसा वापर करते याचा अंदाज होताच’; पराभवानंतर अतुल लोंढेंची पहिली प्रतिक्रिया

Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत क्रॉस वोटिंग आणि सत्तेच्या गैरवापराचा दावा केला.
Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026
Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक प्रतिकूल परिस्थितीत लढत असल्याची जाणीव आम्हाला होती. आमचे संख्याबळ कमी असल्याचे माहीत होतेच, शिवाय सत्ताधारी भाजप यंत्रणेचा कसा वापर करते याचाही अंदाज होता, असे लोंढे म्हणाले.

विधान परिषदेची निवडणूक ही विपरीत परिस्थितीतील आहे, याची कल्पना आम्हाला पहिल्यापासून होती आमच्या संख्याबळाची आम्हाला जाणीव होती. भाजप सत्तेचा कसा वापर करते, याचीही जाणीव होती.

लोकशाही पायी तुटवण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. येथे पक्ष, खासदार फुटतात, येथे एकमेव काँग्रेस अशी होती आम्ही लढू शकतो. हा एकमेव संदेश देण्यासाठी ही निवडणूक होती. "मैने तो दिल जितने की लढाई लढी है," प्रत्येक ठिकाणी माघार घेण्यात आली, पण नागपुरात तसे झाले नाही, कारण नागपूर ही दीक्षा भूमी आहे, असे लोंढे म्हणाले.

Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026
MLC Election Results : विधानपरिषदेत भाजपचा जलवा; बसवराज पाटील राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

लोकशाही कमकुवत करण्याचे प्रकार सध्या सुरू असून पक्ष फोडणे, आमदार-खासदारांना आपल्या बाजूला वळवणे, हे राजकारणात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत काँग्रेसने नागपुरात माघार न घेता लढण्याचा निर्णय घेतला. “मैने तो दिल जितने की लढाई लढी है” असे म्हणत नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीची भूमी असल्याने येथे लढा देणे महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी तब्बल ६८२ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ १३० मते मिळाली. काँग्रेसकडे स्वतःची १७० मते आणि महाविकास आघाडीची एकूण २११ मते असतानाही मोठ्या प्रमाणावर मतफुटी झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026
Chhatrapati Sambhajinagar MLC: जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपने जिंकली; सुहास शिरसाठ विक्रमी मतांनी विजयी

यावर बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपवर थेट आरोप करत, “भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन मतदार फोडले आणि क्रॉस वोटिंग घडवून आणली,” असा खळबळजनक दावा केला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Atul Londhe on Nagpur Vidhan Parishad Election Result 2026
Pension App: पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! ‘Maha-UPLABDHI’ 1 जुलैपासून सुरू; सर्व माहिती मोबाईलवर

“मी निवडणूक हरलो नाही, नैतिकदृष्ट्या माझाच विजय झाला आहे. भाजपच्या दबाव आणि दादागिरीसमोर झुकलो नाही, नागपुरातील निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मला मिळालेली १३० मते विकली गेली नाहीत, हेच या निवडणुकीचे खरे यश आहे,” असेही अतुल लोंढे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com