Winter Session : निवडणुकांचा गोंधळ, हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळणार...

Winter Session Nagpur : महायुती पुन्हा निवडून आल्यानंतर पहिले अधिवेशन नागपूरला घेण्यात आले होते. नागपूरमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी घेण्यात आला होता. हे अधिवेशन नेत्यांच्या नाराजीमुळे चांगलेच गाजले होते. छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता.
Nagpur Winter Session
Winter Session NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 03 Dec : नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद प्रवाद होत असतात. असे असले तरी अधिवेशनाचा कालावधी फारसा वाढल्याचे दिसत नाही.

नागपूर करारानुसार अधिवेशन एक महिन्याचे घ्यावे, अशी मागणी सातत्याने होत असली तरी यावेळी नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या गोंधळामुळे हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे.

अधिवेशन कार्यक्रम आखण्यासाठी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आहे. यात अधिवेशनाचा कालावधी ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असा ठरवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगर परिषदा पुढे ढकलल्या आहेत.

Nagpur Winter Session
Eknath Shinde vs Ravindra Chavan dispute : शिंदे अन् चव्हाण लवकरच एकत्र जेवतील; फडणवीसांनी आखली 'डिनर डिप्लोमेसी'

त्या आता २० डिसेंबरला होणार आहे. २१ डिसेंबरला एकत्र मतमोजणी करण्यात येणार आहे. आचार संहितेच्या दरम्यान अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारला मोठ्या घोषणा करता येणार नाही. विरोधकांवरही आत्ताच्या आता मागण्या पूर्ण करा या मागणीवर मर्यादा येणार आहे. एरवी अधिवेशनाचे कामकाज सोमवार ते शुक्रवार चालते.

शनिवारी आणि रविवारी सुटी दिली जाते. यावेळी मात्र शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशीसुद्धा अधिवेशनाचे कामकाज घेण्यात येणार आहे. एकूण सात दिवसांचे हे अधिवेशन होणार आहे. महायुती पुन्हा निवडून आल्यानंतर पहिले अधिवेशन नागपूरला घेण्यात आले होते. नागपूरमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी घेण्यात आला होता.

Nagpur Winter Session
BJP Politics : नगरपरिषदेत गोंधळ तरीही महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला युती नको...

हे अधिवेशन नेत्यांच्या नाराजीमुळे चांगलेच गाजले होते. छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेले भुजबळ निघून गेले होते तर मुनगंटीवार नागपूरमध्ये असूनही अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते. मंत्री धनंजय मुंडे वादात अडकले होते. ते शेवटचे दोनच दिवस सभागृहात बसले होते. आता भुजबळ मंत्रिमंडळात परतले आहेत तर मुंडे आऊट झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com